Pomegranate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Pomegranate Price : डाळिंबाच्या दरात मोठी सुधारणा

Pomegranate Market Update : राज्यातील बाजारपेठेत परराज्यातील डाळिंबाची आवक मंदावली आहे. तसेच राज्यातील मृग बहर अंतिम टप्प्यात आला असून, डाळिंबाची मागणी वाढली असल्याने गेल्या आठवड्यापासून डाळिंबाच्या दरात मोठी सुधारणा झाली आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : राज्यातील बाजारपेठेत परराज्यातील डाळिंबाची आवक मंदावली आहे. तसेच राज्यातील मृग बहर अंतिम टप्प्यात आला असून, डाळिंबाची मागणी वाढली असल्याने गेल्या आठवड्यापासून डाळिंबाच्या दरात मोठी सुधारणा झाली आहे. सध्या दर्जेदार डाळिंबाला प्रति किलोस १३० ते १८० रुपये असा दर मिळत आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

राज्यात यंदाच्या मृग बहरात सुमारे ४५ हजार हेक्टरवर डाळिंबाच्या बागा साधल्या. हंगाम अंतिम टप्प्याकडे आला आहे. दरम्यान, हंगाम सुरू झाल्यापासून डाळिंबाचे दर स्थिर होते. हंगामाच्या मध्यावर डाळिंबाच्या दरात वाढ झाली होती. त्यानंतर दरात फारसे चढ-उतार झाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत असल्याने दिलासा मिळाला होता. गेल्या दोन महिन्यांपूर्वी डाळिंबाला १३० ते १८० रुपये असा दर होता.

मात्र गत महिन्यात गुजरातमधील राज्यातील बाजारपेठेत डाळिंबे विक्रीस दाखल झाली होती. त्यामुळे डाळिंबाच्या दरात मोठी घसरण झाली होती. या दरम्यान डाळिंबाला प्रति किलोस ४० ते ७० रुपये असा दर मिळाला होता. परिणामी, गुजरातमधील डाळिंबे सुमारे महिनाभर राज्यातील बाजारपेठेत विक्रीला होते. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. याच वेळी राजस्थानमधील राज्यातील डाळिंब विक्रीस येतात. परंतु यंदा राजस्थानातील डाळिंबे विक्रीला आलेली नाहीत. त्यामुळे दर फारसे कमी झाले नाहीत.

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून गुजरातमधील डाळिंबाची आवक हळूहळू कमी होऊ लागली. त्यातच हंगाम शेवटाकडे आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून आवक मंदावली असल्याने बाजारात आवक कमी असल्याने डाळिंबाचा उठाव होऊ लागला आहे. त्यामुळे डाळिंबाचे दर वाढले. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात दर वाढल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. बाजारात डाळिंबाची मागणी असल्याने डाळिंबाचे दर टिकून राहतील असा अंदाज डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

गुजरात आणि राजस्थान या दोन्ही राज्यांत अनुक्रमे २५ टक्के डाळिंबाची काढणी झाली आहे. तर कर्नाटकातील हंगाम अंतिम टप्प्याकडे आला आहे. आंध्र प्रदेशात ५० टक्के क्षेत्रावरील डाळिंबाची विक्री झाली आहे. त्यामुळे जानेवारी ते फेब्रुवारीअखेर देशातील मृग बहरातील डाळिंबाची विक्री पूर्ण होईल, असा अंदाज डाळिंब संघाने व्यक्त केला आहे.

डाळिंबाचे दर (प्रति किलो)

एक नंबर : १३० ते १८०

दोन नंबर : ८० ते ९०

तीन नंबर : ३० ते ४०

परराज्यांतील डाळिंबाची आवक कमी झाली असून हंगामही अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे दर वाढले आहेत. दर स्थिर राहतील. महाराष्ट्र वगळता इतर राज्यात हंगाम मध्यावर आला आहे.
प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

Agriculture Admission 2026: कृषी शिक्षण प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीला सुरुवात

Farmer Children Protest: एकरकमी एफआरपीसाठी शेतकरी पाल्यांचे आंदोलन

Prof. Yasmin Sheikh Dies: ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे निधन

SCROLL FOR NEXT