Fishing Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Fish Market : मच्छीमारांच्या जाळ्यात बांगडा, व्हाईट चिंगळ

Team Agrowon

Ratnagiri News : चार दिवसानंतर समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांच्या जाळ्यात बांगडा, व्हाईट चिंगळ सापडत आहेत. पर्ससीननेटद्वारे मासेमारी बंद असल्यामुळे बांगड्याला किलोला १०० रुपये दर मिळत असल्याने छोटे मच्छीमार समाधानी आहेत. गिलनेटने मासेमारी करणाऱ्यांना रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड ते वरवडे या परिसरात मासळी मिळत आहे.

गतवर्षी बांगड्याचा दर घसरला होता. किलोला ५० रुपयांपर्यंत खाली आला होता. सध्या गणपतीपुळे, वरवडे येथे विविध प्रकारचे मासे मिळत आहेत. त्यामुळे यंदा सुरुवात चांगली झाली आहे.

मात्र पर्ससिननेट मासेमारी सुरू झाली की गिलनेटवाल्यांना मिळणाऱ्या बांगड्याचा दर घसरतो. पर्ससिननेट मासेमारीला १ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तोपर्यंत छोट्या मच्छीमारांना दिलासा आहे.

ट्रॉलिंगच्या काही नौका मासेमारीसाठी गेल्या होत्या, पण अपेक्षित मासे मिळाले नाहीत. गिलनेटच्या नौकांना चार दिवसांत मुहूर्तच साधता आला नव्हता. वेगवान वाऱ्यामुळे नौका समुद्रात नेणे शक्य नव्हते.

शनिवारी (ता. ५) वातावरण शांत झाल्यानंतर छोटे मच्छीमार मासेमारीसाठी रवाना झाले. सलग दोन दिवस चांगले गेले आहे. सुरुवातीपासूनच बांगडा मिळत आहे. एका नौकेला १० टफ (एक टफ ३२ किलोचा) सरासरी तर ५० ते ६० किलो व्हाईट चिंगळं मिळतात. बांगड्याला किलोला १०० रुपये आणि चिंगळाला किलोला ४०० रुपये दर आहे.

केंड माशाचा त्रास

हंगामाच्या सुरुवातीलाच केंड हा मासा मोठ्या प्रमाणात आला आहे. या माशाला टोकदार दात असल्यामुळे तो जाळी कुरतडतो आणि नुकसान करतो. तसेच माशांनाही मारतो. त्यामुळे सध्या मासेमारीला जाणाऱ्या मच्छीमारांपुढे केंडच्या झुंडीपासून जाळी सुरक्षित ठेवण्याचे आव्हान आहे.

वातावरणातील बदलांमुळे समुद्रात जाण्यासाठी मच्छीमारांना प्रतीक्षा करावी लागली. सुरुवातीचे चार दिवस वाया गेले. सलग दोन दिवस समुद्र शांत असल्यामुळे मासेही मिळू लागले आहेत.
- श्रीदत्त भुते, मच्छीमार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Warehouse : गोदामाच्या रचनेनुसार उंचीचे नियोजन

Serious Issues of Rape : लैंगिकतेचे शमन की दमन?

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

SCROLL FOR NEXT