Banana Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Rate : केळीची जाहीर दरानुसार खरेदी करावी

Banana Market : केळीचे दर मध्यंतरी स्थिर होते. परंतु मागील काही दिवसांत दरात घसरण झाली असून, हा प्रकार खरेदीदार करीत आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : केळीची खरेदी जाहीर दरांपेक्षा कमी दरात केली जात आहे. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, केळीची जाहीर दरानुसार खरेदी करावी, अशा मागणीचे निवेदन शेतकऱ्यांनी दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे, की केळीचे दर मध्यंतरी स्थिर होते. परंतु मागील काही दिवसांत दरात घसरण झाली असून, हा प्रकार खरेदीदार करीत आहेत. खरेदीदार एकवटले असून, शेतकऱ्यांचे नुकसान करीत आहेत. जे दर जाहीर केले जातात, त्यापेक्षा कमी दरात खरेदी केली जाते. सध्या १२०० १९०० रुपये प्रतिक्विंटल, या दरात केळीची खरेदी केली जात आहे.

यामुळे शेतकऱ्यांचे वित्तीय नुकसान होत आहे. खरेदीदार, व्यापारी एकी करून दर पाडत आहेत. शिवाय कोरोना, बाजारात उठाव नाही, अशी कारणे सांगत आहेत. याकडे प्रशासन दुर्लक्ष करते. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान रोज होत आहे.

पण कुठेही कारवाई केली जात नाही. व्यापारी, शेतकरी यांची बैठक घेणे अपेक्षित आहे. केळी पीक अधिक कालावधीचे आहे. १२ ते १४ महिन्यात उत्पादन हाती येते. एवढे दिवस खर्च लागतो. शिवाय वादळ, गारपीट, उष्णता अशा संकटांचा सामना करावा लागतो.

शेतकऱ्यांचे मोठे नुकसानही यात होते. पण शेतकरी अडचणींवर मात करून पीक घेतो. पण खरेदीदार मनमानी करतात. अशात शेतकरी वित्तीय संकटात सापडला आहे.

कर्जबाजारी होत आहे. या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याची गरज आहे. या प्रश्नी प्रशासनाने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT