Banana Rate: खानदेशात केळीला काय दर मिळत आहे?

Chandrakant Jadhav

खानदेशात केळीदरात मागील काही दिवसांत घट झाली असून, १२०० ते १९०० रुपये प्रतिक्विंटलचा दर सध्या मिळत आहे. प्रतिकूल वातावरण आणि कमी उठाव यामुळे दरात घट झाल्याची माहिती आहे.

Banana Market | Agrowon

खानदेशात मागील १५ ते २० दिवस ढगाळ, पावसाळी वातावरण आहे. पावसादरम्यान केळीची काढणी ठप्प होती. मागील तीन दिवसांपासून केळीची काढणी सुरू आहे.

India Banana Producing | agrowon

परंतु दरातही मागील सहा ते सात दिवसांत घसरण झाली आहे. १० दिवसांपूर्वी केळीचे कमाल दर २१५० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. परंतु कमाल दर १९००रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत.

Banana | Agrowon

किमान दर १०००, ११०० ते १२५० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. केळीची आवक खानदेशात मागील तीन ते चार दिवसांत फारशी वाढलेली नाही.

Banana Cultivation | Agrowon

परंतु उत्तर भारतात उठाव कमी झाला आहे. खानदेशात सध्या प्रतिदिन ५१ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक सुरू आहे.

Banana Rate | Agrowon

ही आवक कमीच आहे. परंतु पावसाळी वातावरण, प्रतिकूल स्थिती यामुळे स्थानिक भागासह इतर भागांत मागणी कमी झाली आहे.

Banana Export | Agrowon
क्लिक करा