Banana Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Market: खानदेशात केळीची आवक वाढली, दर टिकून!

Khandesh Banana Supply: खानदेशात केळीची आवक वाढू लागली असून, दर १८०० ते २१०० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहेत. सध्या दररोज ३१ ट्रक केळीची विक्री होत असून, लवकरच परदेशात निर्यात सुरू होणार आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News: खानदेशात केळीची आवक वाढत आहे. दर १८०० ते २१०० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर असून, सध्या प्रतिदिन ३१ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे. केळीला उत्तरेकडे उठाव असल्याने दरही टिकून आहेत.

केळीची पुढील २५ दिवसांनंतर परदेशात निर्यातही खानदेशात सुरू होईल. सध्या आगाप लागवडीच्या मृग बहर बागा व पिलबाग केळीमधून आवक सुरू आहे. तसेच उशिरा लागवडीच्या कांदेबाग केळीतही काढणी पूर्ण झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा व अक्कलकुवा भागांत केळीची आवक सुरू झाली आहे.

मागील पंधरवड्यात खानदेशात केळीची प्रतिदिन २४ ट्रक केळीची आवक झाली होती. त्यात पाच ते ट्रकने मागील काही दिवसांत वाढ झाली आहे. केळीची आवक मागील पंधरवड्यातील काही दिवस नीचांकी स्थितीत होती.

त्यात पुढे आणखी वाढ होईल. थंडीमुळे काढणी रखडत सुरू आहे. तसेच अनेक बागांमधील काढणी घड थंडीत पक्व होत नसल्याने अपेक्षित वेळेत सुरू झालेली नाही. पुढे तापमानात जशी वाढ होईल, तशी केळीची आवक वाढेल, असे संकेत आहेत. दर्जेदार किंवा निर्यातीच्या केळीचे दर २३०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. काही शेतकऱ्यांच्या केळीची जामनेर, जळगाव भागांतून निर्यातही झाली आहे.

बऱ्हाणपुरातीलआवकही कमी

मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथेही केळीची आवक कमी आहे. तेथे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, रावेर भागांतूनही केळीची पाठवणूक केली जाते. परंतु सध्या रावेर, मुक्ताईनगर भागांत केळीची आवक कमी असल्याने दर टिकून आहेत. उठावही असल्याने बऱ्हाणपुरातील पाठवणूक फारशी सुरू नाही, अशी माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT