Banana Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Market Rate : खानदेशात केळी दर स्थिर

Banana Market Update : खानदेशात केळीचे किमान दर ५०० ते ७०० रुपये आणि कमाल १२०० ते १३०० प्रतिक्विंटलवर स्थिर आहेत. प्रतिदिन सरासरी १९० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात केळीचे किमान दर ५०० ते ७०० रुपये आणि कमाल १२०० ते १३०० प्रतिक्विंटलवर स्थिर आहेत. प्रतिदिन सरासरी १९० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे. आवक स्थिर असून, केळीला उठावही आहे.

मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथे लिलाव रखडत सुरू आहेत. तेथेही सध्या प्रतिदिन १५० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे.

परंतु सुरुवातीला पाच ते सहा ट्रकमधील केळीचा लिलाव तेथे केला जातो. नंतर लिलाव प्रक्रिया राबविली जात नाही. यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीबाहेरील खरेदीदारांना केळीची विक्री करावी लागत असून, कमी दर तेथे मिळत आहेत. खानदेशात खेडा खरेदी किंवा शिवार खरेदीत दर्जेदार किंवा निर्यातक्षम केळीला कमाल १३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे.

केळीची निर्यातही सध्या रखडत सुरू आहे. आखातातील बहरीन, इराण, इराक, युएई, कतर आदी भागात केळीची पाठवणूक सुरू आहे. जळगाव जि्ल्ह्यातून आखातात रोज सहा ते सात कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची पाठवणूक सुरू आहे. तर नंदुरबारमधील शहादा, तळोदा भागातून रोज दोन कंटेनर केळीची परदेशात पाठवणूक केली जात आहे.

सहा कंपन्या केळी निर्यातीचे काम करीत आहेत. पण निर्यातीच्या केळीचे दरही फारसे वधारलेले नाहीत. स्थानिक किंवा उत्तर भारतातील बाजारात केळीला उठाव आहे. तेथेही जळगाव जिल्ह्यातून रोज ३० ते ४० ट्रक केळीची पाठवणूक फैजपूर (ता. यावल), सावदा (ता. रावेर) आदी भागांतील एजंट करीत आहेत. राज्यात ठाणे, कल्याण, मुंबई, नागपूर तसेच छत्तीसगड, राजस्थान येथेही केळीची पाठवणूक सुरू आहे.

दरात अपेक्षित सुधारणा नाही

केळीची आवक टिकून असल्याने दरात हवी तशी वाढ दिसत नसल्याचे जाणकार सांगत आहेत. पुढे निर्यातीचे काम कमी होईल. यामुळे केळी आवकेचा स्थानिक बाजारातील दबाव वाढू शकतो.

कमी दर्जाच्या केळीची काढणीही सुरू आहे. या केळीचे दर कमाल ७०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. नागपूर, छत्तीसगड भागात या केळीची पाठवणूक केली जात आहे. मध्य प्रदेश, गुजरातमधूनही केळीची आवक उत्तर भारतात होत आहे. यामुळे केळी दरात हवी तशी सुधारणा सध्या दिसत नसल्याची माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT