Banana Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Rate : खानदेशात केळी दर स्थिर

Banana Market : कमी दर्जाच्या केळीची खरेदी ११०० रुपये प्रतिक्विंटल दरातही सुरू आहे.

Team Agrowon

Jalgaon News : केळी दर खानदेशात स्थिर आहेत. आवकेत मोठी घट झाली आहे. दर १४००, १५०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. कमी दर्जाच्या केळीची खरेदी ११०० रुपये प्रतिक्विंटल दरातही सुरू आहे.

सध्या खानदेशात रोज ५० ते ५२ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे. जळगाव, चोपडा, जामनेर, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव या भागांत आवक होत आहे. तर यावल, मुक्ताईनगर, रावेरातही काही शेतकऱ्यांच्या पिलबाग किंवा खोडवा केळी पिकात काढणी सुरू झाली आहे.

मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपुरातही केळीची आवक घटली आहे. तेथील आवक सध्या ३० वाहने (दोन ते १० टन क्षमतेची वाहने) एवढीच आहे. तेथील दरात मात्र सुधारणा दिसत नाही. कमी दर्जाची केळी तेथे येत आहे.

यामुळे तेथे केळी दरात सुधारणा नाही. तेथील केळी दर लिलावात किमान १३५० व कमाल १७०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. केळीची पाठवणूक उत्तर भारतात केली जात आहे. तेथे दर्जेदार केळीस उठाव आहे.

पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, दिल्ली, काश्मिरात खानदेशातून रोज ३० ते ४० १२ ट्रक केळीची पाठवणूक सुरू आहे. तसेच राज्यातही केळीला मागणी आहे. परंतु दरात मोठी सुधारणा होत नसल्याने केळी उत्पादकांत नाराजी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: काकडीला उठाव कायम; सोयाबीनमध्ये घट, कापसात चढ उतार, गव्हाचा भाव स्थिर, केळीला उठाव

Papaya Cultivation Completed: खानदेशात पपई लागवड पूर्ण; जळगावात क्षेत्रवाढ

Onion Prices Issue: कमी दरांमुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत

Monsoon Update: माॅन्सून गोव्यात दाखल; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Agriculture Workshop: सघन कापूस लागवडीवर केळीवेळी येथे मार्गदर्शन

SCROLL FOR NEXT