Banana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Price: पंधरवड्यात केळी दरात एक हजार रुपयांची सुधारणा

Market Update: खानदेशात केळीची आवक अल्प आहे. यातच कुंभ मेळ्यासह उत्तर भारतातून मागणी वाढली आहे. केळी दरात एक क्विंटलमागे एक हजार रुपयांची सुधारणा मागील पंधरवड्यात झाली असून, कमाल दर २६०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले आहेत.

Team Agrowon

Jalgaon News: खानदेशात केळीची आवक अल्प आहे. यातच कुंभ मेळ्यासह उत्तर भारतातून मागणी वाढली आहे. केळी दरात एक क्विंटलमागे एक हजार रुपयांची सुधारणा मागील पंधरवड्यात झाली असून, कमाल दर २६०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले आहेत.

या महिन्याच्या सुरुवातीला केळी दर कमाल १२०० ते १४०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. तर किमान दर ६००, ७०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. डिसेंबरमध्येही केळी दरावर मोठा दबाव होता. आवक कमी असतानादेखील केळी दरात वाढ होत नव्हती. कारण उत्तरेकडे थंडीचा प्रकोप होता.

शिवाय मागणी अल्प होती. स्थानिक बाजारातही केळीस उठाव नव्हता. परंतु या महिन्यात प्रयागराज येथे कुंभ पर्व सुरू झाले. हे पर्व सुरू होतानाच दरवाढ सुरू झाली. दर आठवड्याला केळी दरात वाढ दिसली. या महिन्याच्या अखेरीस दर्जेदार केळीचे कमाल दर २६०० रुपये प्रतिक्विंटल, असे खेडा किंवा शिवार खरेदीत केळीस खानदेशात मिळत आहेत.

मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथेही केळी दरवाढ झाली आहे. तेथे किमान १३५० कमाल २५५० व सरासरी २३५० रुपये प्रतिक्विंटलचा दर केळीस आहे. तेथे रोज फक्त १५ ते १६ ट्रक (एक ट्रक १० ते १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे. खानदेशातही केळीची आवक सध्या प्रतिदिन ४० ते ४२ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) एवढी आहे.

सध्या केळीची आवक रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा, जळगाव, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा भागांत आहे. पिलबाग किंवा खोडवा केळीतून ही आवक होत आहे. राज्यातही थंडी कमी होत असल्याने केळीला मागणी आहे. यामुळे केळीचा तुटवडा आहे. परिणामी सतत दरवाढ होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Laxman Hake: ओबीसींच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, तरीही लक्ष्मण हाके मुंबईकडे जाण्यावर ठाम

Chemical Fertilizer Efficiency: विविध उपायांद्वारे वाढवा रासायनिक खतांची कार्यक्षमता

National Common Mobility Card: एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य; महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय

Madgyal Sheep Breed: ओळख माडग्याळ मेंढीची...

Sericulture Farming: रेशीम शेतीतून अर्थकारणाला गती

SCROLL FOR NEXT