Banana Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana : श्रावणात केळी दराची विक्रमाला गवसणी

श्रावणाच्या प्रारंभीच केळी उत्पादकांना सोन्याचे दिवस आले आहेत. केळीचा भाव विक्रमी म्हणजे २२००० रुपये टनांपर्यंत गेला असून, केळीच्या दरात सात महिन्यांत तब्बल सात पट वाढ झाली आहे.

टीम ॲग्रोवन

कोल्हापूर : श्रावणाच्या प्रारंभीच केळी उत्पादकांना (Banana Farmer) सोन्याचे दिवस आले आहेत. केळीचा भाव विक्रमी (Record Banana Rate) म्हणजे २२००० रुपये टनांपर्यंत गेला असून, केळीच्या दरात (Banana Price) सात महिन्यांत तब्बल सात पट वाढ झाली आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये असणारा ३००० रुपये प्रति टनाचा भाव आता जुलै मध्ये २२००० पर्यंत गेला आहे. यंदा लागवडी (Banana Cultivation) कमी असल्याने श्रावण मासाबरोबरच पूर्ण वर्षभर केळीची चणचण जाणवेल, असा अंदाज आहे.

एक दोन एकर केळीसाठीही केळी व्यापारी ५० ते १०० किलोमीटरचा प्रवास करत असल्याचे दुर्मीळ चित्र यंदा पश्‍चिम महाराष्ट्रात आहे. केळी कमी प्रमाणात असल्याने जिथे केळी आहे तिथे जाऊन डायरेक्ट पैसे देऊन तिथूनच केळी व्यापारी उचलत आहेत. राज्यभरातच केळी नसल्याने यंदा पुढील वर्षभर केळीला सातत्याने मागणी राहील. असा अंदाज व्यापारी सूत्रांनी व्यक्त केला.

ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये कोरोनाच्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर केळी उत्पादकांनी संभाव्य नुकसान पाहता केळीच्या बागा काढून टाकल्या. तिथूनच दर वाढण्यास सुरुवात झाली. प्रत्येक महिन्याला टनास दोन ते तीन हजार रुपयांची वाढ झाली. केळी लागवड नसल्याने दराचा वाढणारा वारू हा चौफेर उधळतच राहिला. श्रावणाच्या पार्श्‍वभूमीवर दर वाढतील, अशी शक्यता होती आणि आता ती खरी ठरली आहे.

जळगाव बरोबरच अन्य भागातील केळींना उत्तर भारतातून व स्थानिक ठिकाणाहून ही मागणी वाढली आहे. येणाऱ्या महिन्यात अनेक धार्मिक कार्यक्रम असल्याने मागणीत वाढच होणार आहे. नेमकी याच वेळी केळी नसल्याने दरही मोठ्या प्रमाणात वाढतील असा अंदाज आहे.

दूरच्या रानात..केळीच्या बनात

एखाद्या गावात एखाद दुसरा शेतकरीच केळी उत्पादन घेत असल्याचे चित्र आहे. या शेतकऱ्याच्या केळी बागात एकाच वेळी अनेक व्यापारी जाऊन दरासाठी स्पर्धा करत असल्याचे सुखावह चित्र केळी पट्ट्यात आहे. जवळपास केळी नसल्याने अगदी एक दोन टनांसाठी सुद्धा ५० ते १०० किलोमीटरचा प्रवास व्यापाऱ्यांना करावा लागत आहे. केळी मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे.

केळी लागवड घटल्याने केळीला उच्चांकी दर मिळत आहे. शेतकऱ्यांनी आता जरी केळीची लागवड केली, तरी पुढील वर्षीही केळीला चांगले दर मिळतील, अशी शक्यता आहे. शेतकऱ्यांनी केळी लागवड करावी.
चेतन पाटील केळी रायपनिंग चेंबर व्यावसायिक, तमदलगे, जि. कोल्हापूर
केळीची उलाढाल मोठ्या प्रमाणात घटली आहे. खरेदीला ग्राहक असला तरी केळी उपलब्ध नसल्याने अगदी २५ टक्क्यांपर्यंत पुरवठा आहे. यामुळे दरात वाढ आहे
अविनाश पाटील, केळी रायपनिंग चेंबर व्यावसायिक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा, ३४४ कोटी निधी मंजूर

Rainfall Sowing Advisory: मॉन्सूनपूर्व पावसावर पेरणीची घाई करू नये : दत्तकुमार कळसाईत

Shaktipeeth Highway Protest: ‘शक्तिपीठ’ महामार्गात बाधित शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार : जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस

Fertilizer Shortage: युरिया, डीएपी, पोटॅश, एनपीके ग्रेडच्या खतांचा कमी पुरवठा

Monsoon Preparedness Concerns: मॉन्सूनपूर्व तयारीवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT