Banana Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Rate : नांदेडमध्ये व्यापाऱ्यां‍नी पाडले केळीचे भाव

अर्धापूर तालुका व परिसरातून केळीच्या हंगामात १०० ते १५० गाड्या देशभरात पाठविल्यास जातात. या परिसरात दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.

टीम ॲग्रोवन

नांदेड : केळीचे भाव (Banana Rate) पाडण्यासंदर्भात एका परप्रांतीय व्यापाऱ्याच्या संभाषणाची क्लिप समाज माध्यमातून व्हायरल झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्‍यांत तीव्र संताप आहे. या व्यापाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्‍यांनी केली आहे. (Take Action Against Banana Traders)

अर्धापूर तालुका व परिसरातून केळीच्या हंगामात १०० ते १५० गाड्या देशभरात पाठविल्यास जातात. या परिसरात दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. यंदाचा हंगाम सुरू झाल्यानंतर केळीच्या भावात तेजी होती. गेल्या तीन ते चार महिन्यांत चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकरी समाधानी होते. पण या भावात गेल्या आठवड्यापासून घसरण सुरू झाली आहे.

केळीला प्रतिक्विंटल दोन हजार ते अडीच हजार रुपये मिळवणारा भाव थेट एक हजार ते एक हजार ४०० रुपयांवर आला. भावात घसरण झाल्याने शेतकऱ्‍यांना खूप मोठा आर्थिक फटका बसत आहे. हा भाव पाडण्यात केळी व्यापाऱ्‍यांचे षड्‍यंत्र असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या संबंधित एका संभाषणाची क्लिप समाज माध्यमातून व्हायरल झाली आहे. दररोज सुमारे चार कोटींची उलाढाल होते. पण ही उलाढाल दोन कोटींवर आली आहे. केळी उत्पादन करणारे शेतकरी अडचणीत आले आहेत. ज्यांच्या बागा कापणीसाठी आल्या आहेत. त्यांचे खूप मोठे नुकसान होणार आहे.

उत्तर भारतातील श्रावण महिना संपत आला आहे. बाजारात मागणीपेक्षा जास्त केळी आल्याने भावात घसरण झाली आहे. शेतकऱ्‍यांनी केळीची काढणी मागणीनुसार करावी.
नीलेश देशमुख, केळीचे व्यापारी
केळीला विक्रमी भाव मिळत होता. त्यामुळे शेतकरी समाधानी होता. पण गेल्या काही दिवसांपासून भावात घसरण झाल्याने शेतकऱ्‍यांचे खूप मोठे नुकसान होत आहे. हा भाव जर व्यापाऱ्‍यांचे संगनमत करून पाडला असेल तर अशा व्यापाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी
बाळू पाटील-शेणीकर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT