Banana Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Export : केळीची आखातातील निर्यात निम्म्याने घटली

Banana Market Jalgaon : देशातून मागील पाच ते सात दिवसांत केळीची आखातातील निर्यात निम्म्यावर आली आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : देशातून मागील पाच ते सात दिवसांत केळीची आखातातील निर्यात निम्म्यावर आली आहे. निर्यातक्षम केळीची आवक कमी झालेली असून, देशांतर्गत किंवा उत्तरेकडे हंगामी फळांची रेलचेल संपल्याने केळीच्या दरात दुप्पट वाढ किंवा चांगली सुधारणा झाली आहे.

केळीचे दर खानदेशात मागील सात दिवसात ११०० ते १२५० रुपये प्रतिक्विंटलवरून २००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल, असे झाले आहेत. निर्यातीच्या केळीला कमाल २५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे.

हा दर जूनमध्ये सरासरी १३०० रुपये प्रतिक्विंटल असा होता. केळीची आवक खानदेशात निम्म्यापेक्षा कमी झाली आहे. जूनमध्ये जळगाव जिल्ह्यातून उत्तर भारत व देशांतर्गत बाजारात प्रतिदिन सरासरी ३०० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची पाठवणूक झाली. पण या महिन्यात किंवा मागील काही दिवसांत ही पाठवणूक प्रतिदिन १२५ ट्रक एवढीच होत आहे.

आगाप लागवडीच्या केळी बागांमधील केळीची काढणी पूर्ण झाली आहे. जळगावमधील रावेर, मुक्ताईनगर, यावल भागात केळीची आवक निम्म्यापेक्षा अधिक घटली आहे. तर चोपडा, पाचोरा, जामनेर या भागात सध्या केळी काढणीवर नाही. नंदुरबारमधील शहादा, तळोदा भागातही केळीची आवक निम्म्यापेक्षा कमी झाली आहे.

उत्तर भारतात उठाव कायम

सध्या श्रावणासंबंधी उत्तर भारतात केळीला मागणी आहे. तेथील बाजारात आंबा कमी दिसत आहे. उत्तर भारतात नेपाळमधून कलिंगड, खरबूज येत होते. त्याची आवकही घटली आहे. उपवासाचे दिवस आहेत. यातच केळीची मागणी काश्मीर, पंजाब, दिल्ली, हरियाना येथे चांगली आहे. यामुळे केळीचे दर वधारले आहेत. राज्यातही नागपूर, ठाणे, मुंबई, कल्याण भागात केळीला मागणी वाढली आहे.

निर्यातही निम्म्यावर

देशातून सध्या सोलापूर, जळगाव, नंदुरबार, थेनी (तमिळनाडू) येथून केळीची आखातात पाठवणूक सुरू आहे. पण सोलापुरातून निर्यात कमी झाली आहे. तेथून सध्या रोज ३० (एक कंटेनर २० टन क्षमता) कंटेनर केळीची पाठवणूक आखातात सुरू आहे.

सोलापुरातून मागील महिन्यात प्रतिदिन ६० ते ७० कंटेनर केळीची पाठवणूक रोज आखातात सुरू होती. खानदेशातूनही निर्यात घटली आहे. मागील महिन्यात प्रतिदिन २० कंटेनर केळीची पाठवणूक जळगाव जिल्ह्यातून आखातात सुरू होती.

ती सध्या फक्त तीन कंटेनर एवढी आहे. देशात सध्या राजपिपला, आणंद (गुजरात), बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) व जळगाव, नांदेड सोलापुरात केळी उपलब्ध आहे. आंध्र प्रदेशातून आवक अद्याप सुरू झालेली नाही. तेथून नोव्हेंबरमध्ये केळीची आवक सुरू होईल.

परिणामी केळीचे दर पुढेही स्थिर राहतील, अशी माहिती जाणकारांनी दिली. देशातून सध्या फक्त ४० ते ४१ कंटेनर केळीची आखातात किंवा परदेशात पाठवणूक सुरू आहे. जूननध्ये देशातून प्रतिदिन सरासरी ११० कंटेनर केळीची परदेशात पाठणूक झाल्याची माहिती मिळाली.

निर्यातीसंबंधी केळी कमी उपलब्ध आहेत. हंगामी फळांची आवक घटल्याने केळीला मागणी वाढली आहे. यातच आगाप केळी बाागांमध्ये काढणी ९५ टक्के पूर्ण झाली आहे. यामुळे केळीच्या दरात चांगली सुधारणा मागील काही दिवसात झाली आहे.
- प्रेमानंद महाजन, महाजन बनाना एक्सपोर्ट, तांदलवाडी (ता. रावेर, जि. जळगाव)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT