sandeep Shirguppe
देशभरात केळीला मोठी मागणी असल्याने बहुतांश राज्यात केळीचे उत्पादन घेतले जाते. केळाचे पीक हे भारतातच नाहीतर जगभरात त्याची लागवड केली जाते.
दरम्यान भारत हा जगातील सर्वात मोठा केळी उत्पादक देश म्हणून ओळखला जातो. देशात २०२१ मध्ये, सुमारे ३३.१ दशलक्ष टन केळीचे उत्पादन झाले जे एकूण जागतिक केळी उत्पादनाच्या २६.४० टक्के असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यानंतर चीन, इंडोनेशिया, ब्राझील आणि इक्वाडोर यांचा नंबर लागतो. या देशांचा जगाच्या एकूण केळी उत्पादनात ५३.७९% योगदान आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, आंध्र प्रदेश हे भारतातील सर्वात मोठे केळी उत्पादक राज्य आहे. २०२१ मध्ये, एकूण उत्पादन सुमारे ५ कोटी ८३ लाख ८ हजार ८८० टन म्हणजे (१७.९९) टक्के होते.
२०२१ मध्ये सुमारे ४ कोटी ६२ लाख ८ हजार ०४० टन (१४.२६) टक्के एकूण केळी उत्पादनासह महाराष्ट्र हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे केळी उत्पादक राज्य आहे.
२०२१ मध्ये सुमारे ३ कोटी ९० लाख ७ हजार २१० टन (१२.०४%) एकूण उत्पादनासह गुजरात भारतातील तिसरा सर्वात मोठा केळी उत्पादक आहे.
तामिळनाडू राज्यात मागच्या दोन वर्षात ३ कोटी ८९ लाख ५ हजार ६४० टन म्हणजे १२ टक्के उत्पादन घेत भारतातील चौथ्या क्रमांकावर आहे.
तामिळनाडू पाठोपाठ कर्नाटकात ३ कोटी ७१ लाख ३ हजार ७९० टन म्हणजे ११.४४ टक्के एकूण उत्पादनासह कर्नाटक हे भारतातील पाचव्या क्रमांकाचे केळी उत्पादक राज्य आहे.