Banana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Export: दाक्षिणात्य भागात निर्यातीच्या केळीची आवक घटली

Khandesh Banana Market: दाक्षिणात्य राज्यांतील केळीची निर्यात कमी झाल्यामुळे खानदेशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. जळगाव, रावेर, यावलसारख्या भागांतून केळीची आवक स्थिर असून निर्यातीला गती मिळाली आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News: देशात निर्यातीच्या केळीची आवक आंध्र प्रदेशात घटली आहे. तेथून आखातसह इतर भागात रोज फक्त चार ते पाच कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची पाठवणूक सुरू आहे. तमिळनाडू भागातूनही रोज पाच ते सहा कंटेनर केळीची निर्यात होत आहे. निर्यातीच्या केळीचे दर सध्या प्रतिक्विंटल १७०० ते १८५० रुपये, असे दाक्षिणात्य भागात आहेत.

खानदेशात अद्यापही निर्यातीच्या केळीची आवक स्थिर आहे. थंडीत खानदेशात केळी बागा व्यवस्थित येत नसल्याने थंडीत काढणीवर येणाऱ्या बागांची लागवड टाळली जाते. यामुळे सध्या खानदेशात केळीची आवक मार्चच्या सुरुवातीपर्यंत अत्यल्प स्थितीत किंवा कमीच होती. सध्या खानदेशात रोज २० ते २५ कंटेनर निर्यातक्षम केळीची आवक होत असून, तिची पाठवणूक आखातात केली जात आहे.

मुक्ताईनगर, रावेर, यावल, धुळ्यातील शिरपूर भागांत आवक सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा, जामनेर, जळगाव भागांतील उशिराच्या कांदेबाग केळी पिकातून आवक नाही. केळीचे दर खानदेशात १६०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. कमी दर्जाच्या केळीचे दर ६००, ८०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. केळीची आवक सध्या स्थिर आहे.

निर्यातीला गती कायम

केळीची आवक मार्चच्या मध्यापासून वाढली आहे. कारण थंडीत केळी पक्व होण्याची गती मंद होती. थंडी आटोपल्यानंतर केळी आवक वाढली. खानदेशात जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, धुळ्यातील शिरपूर भागातून केळीची आवक सुरूच आहे. निर्यातीची गती कायम आहे. दाक्षिणात्य भागातून केळीची आवक कमी असल्याने त्याचा लाभ निर्यातीच्या केळीस होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Economy : अर्थव्यवस्थेत पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के वाढ; शेतीचं चित्र पावसावर अवलंबून

Plant Nutrition: अन्नद्रव्ये पिकांना कशी मिळतात?

Chickens Breeding Management: ब्रीडर कोंबड्यांचे प्रजनन व्यवस्थापन

Tribal Farmer Relief: वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी, महसूलमंत्री बावनकुळेंची माहिती

Chakan Livestock Market: नावारूपाला आलेला चाकणचा जनावरांचा बाजार

SCROLL FOR NEXT