Banana Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Market : खानदेशात केळीची आवक घटली

Banana Update : खानदेशात केळीच्या आवकेत मागील आठवड्यात आणखी घट झाली आहे. यातच उत्तरेकडे थंडी व अन्य अडचणींमुळे बाजारात फारशी सुधारणा दिसत नसल्याची स्थिती आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात केळीच्या आवकेत मागील आठवड्यात आणखी घट झाली आहे. यातच उत्तरेकडे थंडी व अन्य अडचणींमुळे बाजारात फारशी सुधारणा दिसत नसल्याची स्थिती आहे. दरात नरमाई दिसत असून, दर्जेदार किंवा निर्यातक्षम केळीला १८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. तर किमान दर १०००, १४०० ते १७०० रुपये प्रतिक्विंटल, असा आहे.

किमान दरात आवक कमी असल्याने घसरण झालेली नाही. सध्या काश्मिरात पाठवणुकीच्या केळीचे दर क्विंटलमागे १७५० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल, असे दिले जात आहेत.
काश्मिरात मागील थंडी व बर्फवृष्टी सुरू आहे.

यामुळे तेथील बाजारावर परिणाम झाला असून, केळीची तेथील मागणी या आठवड्यात कमी झाली आहे. तेथील बाजार पूर्ववत झाल्यानंतर केळी दरात सुधारणा होईल, असे सांगण्यात आले. मागील वर्षीदेखील डिसेंबरमध्ये केळी दरात घसरण झाली होती.

खानदेशात सध्या प्रतिदिन ४० ते ४२ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे. आवकेत मागील आठ ते १० दिवसांत सुमारे १५ ट्रकने घट झाली आहे. मागील वर्षी डिसेंबर, जानेवारीत लागवड केलेल्या केळी बागांत काढणी सुरू आहे. सर्वाधिक आवक जळगाव जिल्ह्यातील चोपडा, जळगाव, जामनेर, रावेर, यावल व मुक्ताईनगर भागांत होत आहे. तसेच धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा व अक्कलकुवा भागांतही केळीची आवक होत आहे. पण आवक अल्प आहे.

बऱ्हाणपुरातही कमी आवक

मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथे सोमवारी (ता.२) २१ ट्रक (आठ ते १६ टन क्षमता) केळीची आवक झाली. तेथे केळीला कमाल १६१८ व किमान ९२१ रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. तेथील आवकेतही मोठी घट मागील सात ते आठ दिवसांत झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

Nashik APMC: नाशिक बाजार समितीचे विभाजन रद्द करा : शिवाजी चुंभळे

Rahul Gandhi: दहा वर्षांत १५२ पेपरफुटीची प्रकरणे, तरीही एकाही दोषीला शिक्षा का नाही? राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Farmers Protest Suspend: देवगावातील ‘सरण आंदोलन’ तात्पुरते स्थगित

SCROLL FOR NEXT