Tur Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Market Rate : हिंगोलीत तुरीचे क्विंटलचे दर सरासरी १० हजार रुपये

Tur Bajarbhav : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत धान्य बाजारातील (भुसार मार्केट) तुरीच्या दरातील सुधारणा कायम आहे.

Team Agrowon

Hingoli News : ‘‘हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत धान्य बाजारातील (भुसार मार्केट) तुरीच्या दरातील सुधारणा कायम आहे. तुरीचे सरासरी दर १० हजार रुपयांवर पोहचले आहेत,’’ अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

हिंगोली धान्य बाजारात सध्या स्थानिक परिसरातून तुरीची आवक होत आहे. गतवर्षीच्या हंगामात तुरीची उत्पादकता घटल्याचा परिणाम बाजार समितीतील तुरीच्या आवकेवर झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत निम्मी देखील आवक होत नाही. त्यामुळे धान्य बाजारात आठवड्यातील एक दिवसाआड तुरीची आवक घेतली जात आहे.

मागील आठवड्यात मंगळवार (ता.६) ते शनिवार (ता.१०) या कालावधीत तुरीची ६३५ क्विंटल आवक झाली. त्यावेळी प्रतिक्विंटल किमान ९८०० ते कमाल १०२८५ रुपये दर मिळाले. शनिवारी (ता.१०) १८० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ९८०० ते कमाल १०२३० रुपये तर सरासरी १००१५ रुपये दर मिळाले.

गुरुवारी (ता. ८) तुरीची १५० क्विंटल आवक झाली. त्या वेळी प्रतिक्विंटल किमान ९८०० ते कमाल १०२८५ रुपये तर सरासरी १००४२ रुपये दर मिळाले. बुधवारी (ता.६) तुरीची ३०५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ९९०० ते कमाल १०५०० रुपये तर सरासरी १०२०० रुपये दर मिळाले, असे बाजार समितीतील सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CJP Protest: तरुणांच्या आंदोलनाची धग वाढली, देशभरातून पाठिंबा, सरकारकडून चर्चेची तयारी, पण 'सीजेपी'ने ठेवल्या अटी

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, हरभरा आवक स्थिर, टोमॅटो भाव कायम,शेपू दबावातच तर मोसंबी दरात नरमाई

Government Schemes Planning: योजनांच्या लाभासाठी सक्षम प्रकल्प आराखडा महत्त्वाचा : अनिसा महाबळे

Tomato Mar Rog: टोमॅटो पिकातील जिवाणूजन्य मर रोगाची लक्षणे आणि उपाय काय?

Buldhana DCC Bank Election: बुलडाणा जिल्हा बँकेची निवडणूक ठरणार लक्षवेधी

SCROLL FOR NEXT