Cotton Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : देशात ७८ लाखांवर कापूस गाठींची आवक

Cotton Bales Production : देशात नव्या हंगामा (ऑक्टोबर २०२३) पासून कापसाची ७५ लाख गाठींची (एक गाठ १७० किलो रुई) आवक झाली आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : देशात नव्या हंगामा (ऑक्टोबर २०२३) पासून कापसाची ७५ लाख गाठींची (एक गाठ १७० किलो रुई) आवक झाली आहे. ही आवक मागील हंगामाच्या तुलनेत बऱ्यापैकी असून, दर मात्र दबावातच आहेत.

देशांतर्गत बाजारात दरवर्षी ३०० ते ३१० लाख गाठींचा वापर केला जातो. परंतु कापडातील कमी उठाव आणि विविध क्षेत्रातील वित्तीय संकटे यामुळे कापूस गाठींचा वापर कमी आहे. सरकीचे दरही वधारत नसल्याची स्थिती आहे. कारण सरकी तेलासह पशुखाद्यााठी सरकीचा उठाव कमी आहे.

मागील वर्षी सरकीचे दर ३४०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल होते. त्यात नंतरच्या काळात घसरण झाली. परंतु यंदा मात्र सरकी दरांनी ३५०० रुपये प्रतिक्विंटलचा पल्लाच गाठलेला नाही. परिणामी कापूस दरात फारशी वाढ होत नसल्याचे चित्र आहे, असे जाणकारांचे मत आहे.

मागील हंगामात डिसेंबरच्या मध्यापर्यंत देशात सुमारे ६३ लाख कापूस गाठींची आवक झाली होती. यंदा ही आवक १५ लाख गाठींनी अधिक आहे. देशात यंदा सर्वाधिक कापसाची आवक गुजरातेत झाली आहे. तेथील आवक २३ लाख गाठींपर्यंत आहे. राज्यात सुमारे ११ लाख गाठींची आवक झाली आहे. तर उत्तर भारतातही आवक १० लाख गाठींवर आहे.

कापडाला उठाव कमी असल्याने देशातील सूतगिरण्या पूर्ण क्षमतेने कार्यरत नाहीत. सुताला उठाव नसल्याने जिनिंग-प्रेसिंग कारखान्यांतील काम संथ गतीने सुरू आहे. कापूस उद्योगातील साखळी विस्कळीतच आहे. कापसाची निर्यातही यंदा रखडत सुरू आहे. ही निर्यात यंदा ऑक्टोबर २०२३ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत २२ ते २५ लाख गाठी एवढीच राहू शकते, असाही अंदाज आहे.

‘युरोपातील संकटाचा परिणाम’

‘‘रशिया-युक्रेन युद्धाचे ढग कायम आहे. यामुळे युरोपात महागाईचे चटके बसत आहेत. तेथे अन्न व इंधनाचे दर वाढले आहेत. यात आणखी आखाती देश व इस्राईलचे संबंध ताणले गेले आहेत. आयटी क्षेत्रात मंदीची स्थिती आहे. यामुळे युरोप व अमेरिकेतील कापड बाजार संकटात आहे.

युरोप, अमेरिकेतील कापड बाजारावर जगभरातील कापूस उद्योगातील नफ्या-तोट्याचे गणित अवलंबून असते. अमेरिकेत व्याजदरात वाढ सुरूच आहे. ग्राहकांची क्रयशक्ती खालावली आहे. या सर्व बाबींचा परिणाम कापूस बाजारावर झाला आहे,’’ असे जाणकार अरविंद जैन म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT