Cotton Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : ‘सीसीआय’ केंद्रावर मुहूर्ताला १४ क्‍विंटल आवक

Cotton Rate : भद्रावती तालुक्‍यातील नंदोरी (टाकळी) येथील मे. आदिती कॉटन इंडस्ट्रीज येथे सीसीआय अंतर्गत आधारभूत दराने कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली.

Team Agrowon

Chandrapur News : भद्रावती तालुक्‍यातील नंदोरी (टाकळी) येथील मे. आदिती कॉटन इंडस्ट्रीज येथे सीसीआय अंतर्गत आधारभूत दराने कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली. मुहूर्ताच्या एफएक्यू दर्जाच्या कापसाला ७५२१ रुपये दर या वेळी मिळाला.

आधारभूत दराने खरेदीच्या प्रारंभप्रसंगी बाजार समितीचे सभापती भास्कर लटारी ताजणे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते काटा पूजन करून तसेच विक्रीसाठी कापूस आणणाऱ्या शेतकऱ्याचा शाल-टोपी तसेच नारळ देत सन्मान करण्यात आला. पहिल्या दिवशी सुमारे १४ क्‍विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. एफएक्यू दर्जाचा या कापसाला ७५२१ रुपयांचा आधारभूत दर देण्यात आला.

या वेळी बाजार समिती संचालक राजेंद्र डांगे, प्रवीण बांदूरकर, गजानन उताणे, शरद जांभूळकर, श्‍यामदेव कापटे, माजी संचालक अजित फाळके, बाजार समिती सचिव नागेश पुनवटकर यांच्यासह सीसीआय भद्रावतीचे केंद्र प्रमुख निळकंठ अकोटकर, आदिती कॉटन इंडस्ट्रीजचे संचालक अविश बाहे, शेतकरी विश्‍वास कोंगरे, संतोष मांडेकर यांची उपस्थिती होती.

मुहूर्ताला कापूस विक्रीसाठी आणणाऱ्या सन्मानार्थी शेतकऱ्यांमध्ये मोरकांत हरिदास लेडांगे यांचा समावेश होता. बाजार समितीचे कर्मचारी संजय शेंडे, विलास पालकर, रोहित शेडामे, मापारी अरुण पाठक यांचीही या वेळी उपस्थिती होती.

‘शेतीमाल विक्रीसाठी आणा’

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपला कापूस भद्रावती तालुक्‍यातील नंदोरी उपबाजारात विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सीसीआय केंद्रावर कापूस विक्रीसाठी आधी नोंदणी करावी लागते.

त्याकरिता आधारकार्ड, अद्ययावत पीकपेरा असलेला सात-बारा, बॅंक पासबुक अशा दस्तऐवजांची गरज भासते. त्यानुसार नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असेही सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT