Sugar Export Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Market News : ऑक्टोबरसाठी आणखी एक लाख टनांचा कोटा

Sugar Industry Update : केंद्र सरकारने ऑक्टोबर महिन्यासाठी चारच दिवसांच्या कालावधीत देशातील साखर कारखान्यांना पुन्हा १ लाख टन साखरेचा कोटा जाहीर केला आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : केंद्र सरकारने ऑक्टोबर महिन्यासाठी चारच दिवसांच्या कालावधीत देशातील साखर कारखान्यांना पुन्हा १ लाख टन साखरेचा कोटा जाहीर केला आहे. सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर हा कोटा जाहीर करण्यात आला आहे. ऑक्टोबरसाठी पहिला कोटा १३ लाख टनांचा तर दुसरा कोटा १५ लाख टनांचा जाहीर करण्यात आला होता.

यात पुन्हा आणखी १ लाख टनांची भर पडली आहे. ऑक्टोबरसाठीचा एकूण कोटा २९ लाख टनांचा झाला आहे. ३१ ऑक्टोंबरअखेर कारखान्ंयाना हा कोटा संपवावा लागणार आहे. इतर नियमांत कोणताच बदल नसल्याचे केंद्र सरकारने कारखान्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. केंद्र सरकारने सणासुदीला साखरेचे दर वाढू नयेत यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी धडपड सुरू केली आहे.

साखर विक्रीची माहिती दररोज घेणे, बाजारातील दराची माहिती घेऊन दर न वाढण्यासाठी प्रयत्न करणे आदी बाबींमुळे साखरेचे स्‍थानिक दर फारसे वाढले नसल्याची स्‍थिती आहे. दसरा, दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर साठेबाजी होऊ नये, कृत्रिम टंचाई निर्माण करून साखेरेचे किरकोळ बाजारातील भाव व्यापाऱ्‍यांकडून वाढू नयेत यासाठी साखरेचा साठा करणाऱ्या व्यापाऱ्यांचीही चौकशी केंद्रीय स्तरावरून करण्यात येत आहे.

साखरेचा साठा देशात पुरेसा असल्याबाबत केंद्र सरकार ग्राहकांना आश्वस्त करत आहे. साखरेची मागणी वाढल्‍यास केंद्र आणखी साखर विक्रीची परवानगी साखर कारखान्यांना देऊ शकते, असे केंद्रीय सूत्रांनी सागितले.

या पार्श्‍वभूमीवर राज्‍यातील साखर आयुक्‍तालयानेही साठ्याच्या माहितीसंदर्भात कारखान्यांच्या गोदामांची माहिती घेण्यास प्रारंभ केला आहे. राज्यातील प्रत्‍येक प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या माध्यमातून लवकरच साखरेच्‍या गोदामाची माहिती घेण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain Issue: अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकरी धास्तावले

RTE Admission: राज्यात आरटीई प्रवेशाच्या जागांमध्ये मोठी घट

Rabi Crops: पावणेअठरा लाख हेक्टरवर रब्बीचे क्षेत्र

Sangli Water Crisis: सांगलीमध्ये तीन महिन्यांत पाणीसाठ्यात २८ टक्के घट

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

SCROLL FOR NEXT