Amul Milk Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Amul Milk Rate Hike : 'अमूल'ने दूधाच्या विक्रीदरात केली वाढ

दुधाचा उत्पादन खर्च वाढल्यामुळे ही वाढ करण्यात आली असल्याचे अमूलकडून सांगण्यात आले.

Team Agrowon

पुणे - महाराष्ट्र (maharashtra) शेजारच्या गुजरातमधील (Gujrat) प्रसिद्ध अमूल डेअरीने (Amul dairy) दुधाच्या विक्री (Milk Rate) दरात प्रतिलीटर ३ रुपयांनी वाढ केली आहे. या दरवाढीचे पत्रक अमूलने प्रसिद्ध केले.

यापूर्वी अमूलने ऑक्टोबरमध्येही दुधाच्या विक्री दरात प्रतिलीटर २ रुपयांची वाढ केली होती. 

अमूलकडून नवीन विक्रीचे दर जाहीर करण्यात आले आहेत.

त्यानुसार अमूल गोल्ड ६६ रुपये प्रतिलीटर, अमूल ताजा ५४ रुपये प्रतिलीटर, अमूल गाईचे दूध ५६ रुपये प्रतिलीटर तर अमूल म्हशीचे ए२ दूध ७० रुपये प्रतिलीटर करण्यात आले आहेत. 

दुधाचा उत्पादन खर्च वाढल्यामुळे ही वाढ करण्यात आली असल्याचे अमूलकडून सांगण्यात आले.

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पशुखाद्याच्या किंमतीत २० टक्के वाढ झाली आहे.

तसेच मागील वर्षभरात उत्पादन खर्चात झालेली वाढ लक्षात घेऊन दुधाच्या खरेदीदरात ८ ते ९ टक्क्यांनी वाढ केली आहे, असेही अमूलकडून पत्रकात सांगण्यात आले.

दरम्यान, मदर डेअरीकडून डिसेंबर महिन्यात दुधाच्या विक्री दरात २ रुपये प्रतिलीटरची वाढ करण्यात आली होती.    

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT