Mango Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Hapus Mango Rate : हापूसच्या ६४ हजार पेट्यांची आवक

Mango Season : गुढीपाडव्यानंतर हापूसच्या हंगामाला खऱ्या अर्थाने बहर आला आहे. वाशीच्या एपीएमसी फळ बाजारात गेल्या काही दिवसांपासून हापूसची आवक वाढल्याने दरात मोठी घसरण झाली आहे.

Team Agrowon

Thane News : गुढीपाडव्यानंतर हापूसच्या हंगामाला खऱ्या अर्थाने बहर आला आहे. वाशीच्या एपीएमसी फळ बाजारात गेल्या काही दिवसांपासून हापूसची आवक वाढल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असलेला हापूस आता आवाक्यात आला आहे. शनिवारी (ता. ५) एपीएमसीत तब्बल ६४ हजार १८४ पेट्या दाखल झाल्या आहेत.

गणेश जयंतीच्या मुहूर्तावर १ फेब्रुवारीला एपीएमसी फळ बाजारात कोकणातील देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी दाखल झाली होती. तेव्हा देवगड हापूस आंब्याच्या पाच डझनांच्या पेटीला १२ हजार भाव मिळाला होता. यावर्षी हवामानाचा परिणाम झाल्याने यंदा कोकणातील हापूस कमी राहणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला होता.

ही चिंता आता काहीशी मिटली असून, गुढीपाडव्याच्या मुहूर्तापासून वाशीतील एपीएमसी फळ बाजारात कोकणातील रत्नागिरी आणि देवगड भागातून मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची आवक होण्यास सुरुवात झाली आहे.

शनिवारी (ता. ५) फळ बाजारात ६४ हजार १८४ पेट्या दाखल झाल्या. त्यामुळे गेले दोन महिने हापूसचे गगनाला भिडलेले भाव आता बऱ्यापैकी उतरले असून, चांगल्या प्रतीचा हापूस सर्वसामान्य आंबाप्रेमींच्या आवाक्यात आला आहे. एपीएमसी घाऊक फळ बाजारात कोकणातील हापूस आंब्याच्या पाच डझनच्या पेटीचा भाव एक हजार ५०० ते तीन हजार रुपये आहे.

१० मेपर्यंत मुबलक उपलब्ध

१ एप्रिल ते १० मे या कालावधीत कोकणातील हापूस आंबा मुबलक प्रमाणात उपलब्ध राहील. त्यामुळे एप्रिल महिन्यात कमी झालेला आंब्याचे भाव मे महिन्यात पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT