Rice Production Agrowon
ॲग्रोमनी

Food crisis:अनेक देशांची अन्नसुरक्षा भारतीय तांदळावर अवलंबून

जागतिक बाजारात धान्याच्या किंमती वाढत असताना भारतात तांदूळ उत्पादन (Rice Production) घटण्याच्या शक्यतेने चिंता वाढली आहे. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा यांसारख्या प्रमुख तांदूळ उत्पादक राज्यांत पुरेसा पाऊस पडला नाही.

Team Agrowon

भारतात भात लागवड घटल्यामुळे जागतिक अन्न संकटात (Global Food Crisis) भर पडण्याची शक्यता आहे. जगातील एक प्रमुख भात उत्पादक देश म्हणून भारताकडे बघितलं जातं. बांगलादेश, चीन, नेपाळ, मध्य पूर्वेतील देशांसह सुमारे १०० देशांना भारताकडून तांदूळ पुरवण्यात येतो.

अनेक देशांची अन्नसुरक्षा (Food Security) भारताच्या तांदळावर अवलंबून आहे. मात्र यावर्षी मॉन्सूनच्या सुरूवातीच्या टप्प्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे भाताचे क्षेत्र घटले. गेल्या तीन वर्षांतील सगळ्यात कमी भात लागवड यंदा झाली. त्यामुळे तांदूळ उत्पादन घटण्याची चिन्हे आहेत.

जागतिक बाजारात धान्याच्या किंमती वाढत असताना भारतात तांदूळ उत्पादन (Rice Production) घटण्याच्या शक्यतेने चिंता वाढली आहे. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा यांसारख्या प्रमुख तांदूळ उत्पादक राज्यांत पुरेसा पाऊस पडला नाही. त्यामुळे देशातील एकूण भात लागवड क्षेत्रात आतापर्यंत १३ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली. भारताच्या तांदूळ उत्पादन घटले तर देशांतर्गत महागाईसोबत दोन हात करणे अवघड जाणार आहे. याशिवाय निर्यातीवरही मर्यादा येणार असल्याची भीती व्यापारी सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.

भारतीय तांदळावर अवलंबून असणाऱ्या जगातील लक्षावधी लोकांना त्याचा फटका बसणार आहे. जगातील ४० टक्के तांदळाची निर्यात एकट्या भारताकडून केली जाते. अन्नसुरक्षा आणि देशांतर्गत महागाई नियंत्रणाचे कारण पुढे करत केंद्र सरकारने यापूर्वीच गहू निर्यातीवर बंदी घातली. तर साखरेच्या निर्यातीवर बंधने आणली. आता तांदळावरही निर्यातबंदीची कुऱ्हाड येणार का, हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

बांगलादेशातून तांदळाची मागणी वाढली आहे. सध्या वाहतूक खर्चासह प्रति टन ३६५ डॉलर दराने तांदूळ निर्यात होत आहे. सप्टेंबर अखेरीस निर्यात दर प्रति टन ४०० डॉलरवर पोहचण्याची शक्यता आहे. देशांतर्गत बाजारातही तांदूळ उत्पादनातील संभाव्य घटीचे पडसाद उमटले आहेत. तांदळाचे काही प्रकार १० टक्क्यांनी महागले आहेत.

रशिया-युक्रेन संघर्षामुळे जागतिक बाजारात गहू आणि मक्याच्या किंमतींत वाढ झाली. जगातील अनेक देशांत अन्नसंकट निर्माण झाले आहे. भारतीय तांदळाचे उत्पादन घटल्यास हे संकट अधिकच गडद होण्याची चिन्हे आहेत.

भारतातील तांदूळ उत्पादनाचे भवितव्य आता येत्या दोन महिन्यांतील पावसावर अवलंबून आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सरासरी पाऊस होऊन भात लागवडीतील घट भरून निघेल, असा आशावाद काही कृषी शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, भात उत्पादक राज्यांतील लागवडीचे आकडे पाहता केंद्र सरकारने तांदळापासून इथेनॉल निर्मितीच्या धोरणात बदल करावा, अशी मागणी माजी केंद्रीय कृषी सचिव सिराज हुसेन यांनी केली आहे.

रशिया- युक्रेन संघर्षानंतर अन्न संकटाच्या काळात 'अन्न की इंधन ' (food versus fuel) असा वाद रंगण्याची शक्यता आहे आजमितीस तरी देशातील तांदूळ उत्पादनात किती घट होईल, हे नेमके सांगता येणार नाही. मात्र तोवर तांदळापासून इथेनॉल निर्मिती सुरु ठेवणे शहाणपणाचे ठरणार नाही, असे सिराज हुसेन म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fish Transport Technology: जिवंत माशांच्या वाहतुकीसाठी स्मार्ट कॅरी बॅग

Dam Storage: अकोला, बुलडाण्यातील प्रकल्प तुडुंब

Khandesh Heavy Rain: खानदेशात २५ हजार हेक्टरवरील पिकांची वाताहत

Water Conservation: लोकसहभागातून जलसमृद्ध गावाची लोक चळवळ व्हावी

Solapur Heavy Rain: सोलापुरात आठ मंडलांत अतिवृष्टी,सोयाबीनसह तूर, उडदाचे नुकसान

SCROLL FOR NEXT