Chana Market News Updates Agrowon
ॲग्रोमनी

Chana Market : हरभरा दरात सुधारणा होईल की नाही?

नाफेडची खरेदी सुरु झाली. त्यामुळे खुल्या बाजारातील हरभरा दरालाही आधार मिळेल, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

Team Agrowon

अनिल जाधव

पुणेः देशातील बाजारात सध्या हरभरा भाव (Chana Rate) दबावात आहेत. पण महाराष्ट्रासह इतर महत्वाच्या हरभरा उत्पादक राज्यांमध्ये पिकाला फटका बसला. त्यातच नाफेडची (Nafed) खरेदी  सुरु झाली.

त्यामुळे खुल्या बाजारातील हरभरा दरालाही आधार मिळेल, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

देशात लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. त्यामुळे हरभरा डाळिला उठाव मिळत आहे. सकारने यंदा देशात १३६ लाख टन हरभरा उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला.

पण शेतकरी उत्पादकता घटल्याचे सांगत आहेत. त्यामुळे सरकारचा हरभरा उत्पादनाचा अंदाज चुकण्याची दाट शक्यता असल्याचे व्यापारी आणि उद्योगांकडून सांगण्यात येत आहे. 

हरभरा बाजाराला आधार मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील काही दिवसांपासून महत्वाच्या ग्राहक बाजारात सुधारणा होताना दिसत आहे. दिल्ली, कोलकाता, बंगलूरू आणि मुंबई बाजारात क्विंटलमागं ५० ते १०० रुपयांची सुधारणा झाली.

मार्च महिन्यापर्यंत देशात यंदा हरभरा उत्पादन वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. पण मार्च महिन्यात अनेक भागातील हरभरा काढणी सुरु झाली. 

हरभरा काढणी केलेल्या शेतकऱ्यांनी यंदा उत्पादन घटल्याचे सांगितले. महाराष्ट्रात यंदा सर्वाधिक हरभरा लागवड झाली. राज्यात २९ लाख हेक्टरवर झाली.

म्हणजेच देशातील एकूण लागवडीपैकी तब्बल २६ टक्के क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात आहे. पण राज्यातील शेतकरी यंदा उत्पादकता घटल्याचे सांगत आहेत. तसेच राजस्थान आणि मध्य प्रदेशातही काही भागांमध्ये उत्पादन कमी झाल्याचे वृत्त आहे. 

सध्या नाफेडकडे १० लाख टनांपर्यंत हरभऱ्याचा स्टाॅक असल्याचे सांगितले जाते. तसेच व्यापारी आणि उद्योगांकडे ६ लाख टनांच्या दरम्यान हरभरा आहे. तर देशातील उत्पादन यंदा १०० ते १०५ लाख टनांच्या दरम्यानच स्थिरावे, असाही अंदाज उद्योगांनी व्यक्त केला.

उत्पादन कमी राहिल्यास खुल्या बाजारातही दराला आधार मिळेल, असा अंदाज आहे. 

नाफेडची खरेदीही सुरु झाली. तसेच राज्यात शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी मुदत वाढवून दिली. त्यामुळे नाफेड चांगली खरेदी करण्याची शक्यता आहे.

नाफेडने चांगील खरेदी केल्यास खुल्या बाजारातील दरालाही आधार मिळेल. हरभऱ्याचे भाव खुल्या बाजारात ५ हजार ते ५ हजार २०० रुपयांच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. --

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget: शेती आणि पूरक उद्योगासाठी ‘अर्थपूर्ण’ पाऊल

Water Sector Budget: जलक्षेत्रासाठी दीर्घकालीन तरतुदींवर भर

Agriculture Budget 2026: कोरडवाहू शेतीत कृषी संलग्न व्यवसायाला चालना

Agri Union Budget 2026: अन्नदाता शेतकऱ्यांचा भ्रमनिरास

Union Budget 2026: शेती बेदखलच!

SCROLL FOR NEXT