Chana Market  Agrowon
ॲग्रोमनी

Chana Market : हरभरा बाजारात सुधारणार की नाही?

Chana Production : देशात यंदा विक्रमी १३६ लाख टन हरभरा उत्पादन होईल, असा अंदाज केंद्र सरकारने व्यक्त केला होता. पण यंदा हरभऱ्याची उत्पादकता मोठ्या प्रमाणात घटली.

Anil Jadhao 

Chana Rate Update : देशात यंदा विक्रमी १३६ लाख टन हरभरा उत्पादन होईल, असा अंदाज केंद्र सरकारने व्यक्त केला होता. पण यंदा हरभऱ्याची उत्पादकता मोठ्या प्रमाणात घटली. शेंड्यावरच्या घाट्यांमध्ये दाणाच भरला नव्हता. त्यामुळे उत्पादनात २० टक्क्यांपर्यंत घट झाल्याचं शेतकरी सांगत होते.

पण बाजारात हरभरा दाखल झाल्यानंतर दरावर दबावा आला होता. हा दबाव आजही कायम आहे. यंदा तूर, मूग आणि उडदाचे भाव तेजीत आहेत. हरभरा उत्पादनालाही फटका बसला. त्यामुळे हरभरा भाव वाढतील, असा अंदाज होता. पण हा अंदाज सध्या तरी खरा ठरताना दिसत नाही.

नाफेडच्या हरभरा खरेदीचा वेग मागील चार दिवसांपासून कमी झाला. या काळात नाफेडने देशभरात केवळ दोन लाख टनांच्या दरम्यान हरभरा खरेदी केल्याचं दिसतं. नाफेडने चालू हंगामातही हरभऱ्याची चांगली खरेदी केली.

त्यामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. पण नाफेड गेल्यावर्षीएवढा म्हणजेच २६ लाख टनांपर्यंत खरेदी करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण नाफेडच्या खरेदीचा वेग कमी झाला. तसेच अनेक केंद्रांवरील खेरदीही बंद झाली आहे. त्यामुळं यंदाही विक्रमी खेरदीची शक्यता मावळल्याचं दिसते.

नाफेडने आतापर्यंत देशभरात १७ लाख ९१ लाख टनांची खरेदी केली. यापैकी महाराष्ट्रात ६ लाख ३२ हजार टनांची खेरदी झाली. तर मध्य प्रदेशात जवळपास ६ लाख टन आणि गुजरातमध्ये तीन लाख टनांची खरेदी झाली.

म्हणजेच या तीन राज्यांतच १५ लाख ३२ हजार टनांची खरेदी झाली. तसचं ही तीन्ही राज्ये हरभरा उत्पादनात महत्वाची आहेत.

नाफेडने यंदा देशातील महत्वाच्या आठ हरभरा उत्पादक राज्यांमध्ये खरेदी सुरु केली होती. यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक खरेदी झाली. तर कर्नाटकात ७९ हजार टनांचा हरभरा नाफेडने खेरदी केला. आंध्र प्रदेशात ६४ हजार टन, उत्तर प्रदेशात ६ हजार ५५० टन, राजस्थानमध्ये ६२ हजार टन आणि तेलंगणात ५० हजार टनांची खरेदी झाली होती. उत्तर प्रेदशात सर्वात कमी हरभरा खरेदी झाली आहे.

नाफेडची खेरदी चांगली झाली तरी खुल्या बाजारातील दराला आधार मिळताना दिसत नाही. बाजारातील आवकही मर्यादीत होत असल्याचं व्यापारी सांगत आहेत. सध्या हरभऱ्याचे भाव ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान कायम आहेत. हरभरा बाजारात पुढील काही काळ स्थिरता दिसू शकते, असा अंदाज सध्याच्या परिस्थितीवरून जाणकारांनी व्यक्त केला.

सरकारने तुरीसोबतच व्यापारी, स्टाॅकिस्ट आणि प्रक्रिया उद्योगांना आपल्याकडील हरभरा स्टाॅकचीही माहिती देण्यास सांगितले आहे. सरकार एकीकडे देशात विक्रमी उत्पादन झाल्याचे सांगत आधीच बाजारावर दबाव निर्माण करतं.

तर दुसरीकडे व्यापारी, स्टाॅकीस्ट आणि प्रक्रियादारांवर दबाव वाढवतं. यामुळं सध्या हरभरा बाजारही दबावात आहे. पुढील काळात मात्र बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Road Committee: शेतरस्त्यांसाठी समिती स्थापन करणार : फडणवीस

Mahakrushi App: ‘महाकृषी’ ॲपमुळे कामकाजात पारदर्शकता

APMC Cess Scam: सेस चोरीप्रकरणी ‘पणन’ने अहवाल मागविला

Maize Production: राज्यात यंदा खरिपात मका क्षेत्र वाढीचा अंदाज

Raisin Illegal Import: चीनमधून बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवा

SCROLL FOR NEXT