Chana Market News Updates Agrowon
ॲग्रोमनी

Chana market: हरभऱ्याचा बाजार दबावातच का आहे?

Chana Production : देशातील हरभरा उत्पादनात यंदा मोठी घट झाल्याचं शेतकरी सांगत आहेत. बाजारातील हरभरा आवकही जास्त प्रमाणात होत नाही.

Team Agrowon

Chana Rate : देशातील हरभरा उत्पादनात यंदा मोठी घट झाल्याचं शेतकरी सांगत आहेत. बाजारातील हरभरा आवकही जास्त प्रमाणात होत नाही. हरभरा आवकेचा दबाव कमी झाला. तर दुसरीकडे नाफेडची खरेदीही सुरु आहे. नाफेडने आतापर्यंत १९ लाख टन हरभरा खरेदीचा टप्पाही ओलांडला.

पण नाफेड हा स्टाॅक नंतर बाजारात आणून दर पाडेल. तसेच सरकारने तुरीसोबतच हरभऱ्याच्या स्टाॅकचीही माहिती देण्यास सांगितले आहे. यामुळे हरभरा बाजार दबाव कायम आहे, असे जाणकारांनी सांगितले.

देशात मागील हंगामात हरभरा दरात मोठी घट झाली होती. खुल्या बाजारातील हरभरा भाव हमीभावापेक्षा ७०० रुपयांपर्यत कमी होते. पण यंदा उत्पादनात मोठी घट झाली होती. त्यातच नाफेडची हरभरा खरेदीही चांगल्या प्रमाणात सुरु होती.

त्यामुळे यंदा हरभरा दर चांगले राहतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती. कारण यंदा उत्पादन २० टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचे शेतकरी सांगत होते. पण केंद्र सरकारने १३६ लाख टनांचा अंदाज कायम ठेवला आहे.

चालू हंगामात तूर आणि इतर काही कडधान्याचे भाव तेजीत आहेत. याचा आधार हरभऱ्याला मिळेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला होता. पण सरकारने हरभरा बाजारावर दबाव ठेवला आहे. तुरीचे दर तेजीत असल्याने सरकारने व्यापारी, स्टाॅकिस्ट, प्रक्रियादार आणि आयातदारांना आपल्याकडील स्टाॅकची माहिती देण्यास सांगितले होते.

तुरीसोबत हरभऱ्याच्या स्टाॅकचीही माहिती देण्यास सांगितले होते. तसेच चुकीची माहिती दिल्यास कारवाईचाही इशारा दिला. याचा हरभरा बाजारावर दबाव आहे. 

नाफेडच्या खरेदीचाही बाजारावर दबाव असल्याचे सांगितले जाते. नाफेडने देशात आतापर्यंत १९ लाख टनांची खरेदी केली. मागील हंगामातही सरकारने २६ लाख टन हरभरा खरेदी केला होता. पण नंतरच्या काळात हा हरभरा टप्प्याटप्प्याने बाजारात आणून दर पाडले होते. यंदाही सरकार याचीच पुनरावृत्ती करु शकते, अशी भीती बाजारात व्यक्त केली जात आहे.                                                 

तूर आणि उडदाचा तुटवडा आहे. ही दोन्ही कडधान्ये जागतिक बाजारात खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे ही कडधान्ये आयातीवर मर्यादा आहेत. त्यामुळं सरकार शक्य आहे त्या कडधान्याचे भाव कमी ठेवण्याचा प्रयत्न करेल, अशी भीती बाजारात आहे. सरकारकडे हरभऱ्याचा स्टाॅकही जास्त आहे.

आतापर्यंत झालेली १९ लाख टनांची खरेदी आणि मागील हंगामातील १५ लाख टनांचा शिल्लक साठा असा एकूण ३४ लाख टनांचा स्टाॅक झाला आहे. सरकारने हरभरा विक्री सुरु केल्यानंतर दरावर दबाव वाढत जाईल, अशी भीती आहे.

या सर्व कारणांमुळे खुल्या बाजारात दर दबावात आहेत. यामुळे हरभरा उत्पादन कमी होऊनही दबावात आहेत. तसेच नाफेडच्या हरभरा खरेदीचा हरभरा बाजाराला आधार मिळताना दिसत नाही. सध्या हरभऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजार रुपये दर मिळत आहे. तर हरभरा हमीभाव ५ हजार ३३५ रुपये आहे. म्हणजेच हमीभावापेक्षा दर खूपच कमी आहेत. पुढील काही काळ तरी हरभरा भाव हमीभावापेक्षा कमी राहू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Surya Ghar Yojana: सौरऊर्जेतून घरगुती, कृषीला शाश्‍वत वीजपुरवठा

Solar Agriculture Pump: सौरपंपासाठी शेतकऱ्यांच्या नशिबी रखडपट्टीच

Crop Loan: कर्ज पुनर्गठनाची अंमलबजावणी रखडली

Tomato Late Blight: टोमॅटो पिकावरील उशिराने येणारा करपा नियंत्रणाचे सोपे उपाय

Nanded Degloor Expressway: नांदेड–देगलूर ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्गाला मिळणार गती

SCROLL FOR NEXT