Cotton, Soybean market Agrowon
ॲग्रोमनी

Cotton, Soybean Market : कापूस, सोयाबीन बाजारात काय सुरु आहे?

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडचे दर तेजीत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयापेंडचे भाव देशातील भावापेक्षा जवळपास एक हजार रुपयाने जास्त आहेत.

Anil Jadhao 

Cotton, Soybean Rate News : सोयाबीनचे भाव मुख्यतः सोयापेंडवर अवलंबून असतात. सध्या देशातील सोयापेंडचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील दरापेक्षा कमी झाले आहेत. देशातून सोयापेंड निर्यातही चांगली होत आहे. तरीही देशातील सोयाबीनचे दर दबावात आहेत. तर कापसाच्या दरावरील दबावही कायम आहे. 

देशातून सोयापेंड निर्यातीचा वेग वाढल्यानंतर सोयाबीनचेही दर वाढतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण सध्या असं होताना दिसत नाही.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडचे दर तेजीत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयापेंडचे भाव देशातील भावापेक्षा जवळपास एक हजार रुपयाने जास्त आहेत, असं निर्यातदारांनी सांगितलं.

भारताची सोयापेंड निर्यातीसाठी ५७५ डाॅलरच्या आसपास उपलब्ध आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारातील दर ५७० ते ५८५ डाॅलरच्या दरम्यान आहेत. भारताची सोयापेंड स्वस्त झाल्यानं निर्यात वाढली. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातही सोयापेंड निर्यातीची गती आणखी वाढेल, असा अंदाजही निर्यातदारांनी व्यक्त केला.

सोयापेंड निर्यात वाढली तरी शेतकऱ्यांना मिळारा भाव मात्र कायम आहे. आजही सोयाबीनची भावपातळी सरासरी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान कायम आहे.

रुईचा भाव कायम

कापूस बाजारातील नरमाई सुध्दा कायम आहे. आज देशातील बाजारात कापसाला सरासरी ८ हजार ते ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर होता. ही दरपातळी मागील काही दिवसांपासून कायम होती.

तर रुईची दरपातळी आजही प्रतिक्विंटल १७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान कायम होती. तर आंतरराष्ट्रीय बाजारात काॅटलूक ए इंडिक्स म्हणजे रुईचा प्रत्यक्ष खरेदी दर काहीसा कमी होऊन १००.९५ सेंट प्रतिबुशेल्सपर्यंत नरमला होता.

रुपयात हा दर १९ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल होतो. म्हणजेच आजही देशातील रुईचे दर स्वस्त आहेत.

कापूस वायदे 

सीबाॅटवरील वायद्यांमध्येही कापूस दरातील चढ उतार आजही कायम होते. सायंकाळी पाच वाजेपर्यंत कापसाचे वायदे ८५.७५ सेंट प्रतिबुशेल्सवर होते. रुपयात हा भाव १५ हजार ५०० रुपये होतो. पण कापसाचे वायदे मागील काही दिवसांपासून ८२ ते ८८ सेंटच्या दरम्यान कायम आहेत.

कापूस दर सुधारतील का?

बाजारातील स्थिती बघता कापूस दर सुधारण्यास पोषक स्थिती आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी आणि कापसाला वाढलेली मागणी यामुळं दरात सुधारणा होऊ शकते.

यंदा कापसाची सरासरी दरपातळी ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहीलं, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

सोयाबीनची दरपातळी काय राहू शकते?

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे दर तेजीत आहेत. कापसाप्रमाणं देशातील सोयापेंडचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील दरापेक्षा कमी आहेत. त्यामुळं निर्यात वाढली. देशातील बाजारात सोयाबीनची आवकही मर्यादीत आहे.

त्यामुळं सोयाबीनचे दर वाढू शकतात. सोयाबीनची दरपातळी यंदा ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT