Tomato Market Agrowon
ॲग्रोमनी

Tomato Market Rate : टोमॅटोचे भाव लवकरच कमी होतील: रोहीत कुमार

Tomato Bajarbhav : बाजारात सध्या टोमॅटोचा पुरवठा कमी झाल्याने दरात मोठी तेजी आली आहे. पण टोमॅटो अति नाशवंत शेतीमाल आहे. सध्या भावात झालेली वाढ ही तात्पुरत्या घटनांमुळे झाली.

Team Agrowon

Tomato Production Update : बाजारात सध्या टोमॅटोचा पुरवठा कमी झाल्याने दरात मोठी तेजी आली आहे. पण टोमॅटो अति नाशवंत शेतीमाल आहे. सध्या भावात झालेली वाढ ही तात्पुरत्या घटनांमुळे झाली. दरवर्षी या काळात टोमॅटोच्या भावात वाढ होत असते.

त्यामुळे भावात झालेली वाढ ही लवकरच कमी होईल, असा विश्वास ग्राहक कल्याण विभागाचे सचिव रोहीत कुमार यांनी व्यक्त केला.

अनेक बाजारात टोमॅटोचा किरकोळ विक्रीदर १०० रुपयांवर पोचला. तर घाऊक बाजारातील दर ६० ते ७० रुपये आहे. ग्राहक कल्याण विभागाच्या आकडेवारीनुसार देशात आज सरासरी भाव ५० रुपये होता.

तर दिल्लीत सरासरी ६० रुपये, मुंबईत ४२ रुपये, कोलकाता ७५ रुपये आणि चेन्नईत ६७ रुपये किंमत होती. बंगळूरुमध्ये टोमॅटोचे दर ५२ रुपये, जम्मूमध्ये ८० रुपये, लखनऊ ६० रुपये, शिमला ८८ रुपये आणि भुवनेश्वरमध्ये १०० रुपये भाव मिळत आहे, अशी माहिती केंद्रीय ग्राहक कल्याण विभागाने दिली.

दिल्लीतील मदर डेअरीच्या दुकानांमध्ये टोमॅटोचे भाव जवळपास ८० रुपये प्रतिकिलो आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत आजचे भाव जवळपास दुप्पट होते. दिल्लीला टोमॅटो पुरवठा करणाऱ्या महत्वाच्या राज्यांमध्ये झालेल्या पावसाने पुरवठा विस्कळीत झाला.

मदर डेअरीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधून होणारा टोमॅटो पुरवठा झालेल्या पावसामुळे झाला. याचा परिणाम दरावर होत आहे.

टोमॅटो भावात झालेली ही वाढ सरकारची डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे सरकार टोमॅटोच्या भावावर लक्ष ठेऊन आहे. सध्याची भाववाढ ही देशभरात दिसून येत आहे.

टोमॅटोचे भाव देशातील बहुतांशी भागात किरकोळ बाजारात ८० ते १०० रुपयांपर्यंत वाढल्याचे वृत्त आहे. जून महिन्यात पावासाची तूट, चक्रीवादळामुळे झालेला पाऊस आणि उष्णता यामुळे बाजारातील टोमॅटो पुरवठा कमी झाला.

केंद्रीय ग्राहक कल्याण विभागाचे सचिव रोहीत कुमार यांच्या मते, टोमॅटोचे भाव याकाळात दरवर्षी वाढत असतात. टोमॅटोच्या भावात झालेली वाढ ही काही नविन नाही. या काळात पावसामुळे पुरवठा विस्कळीत होत असतो. ते यंदाही घडले.

हंगामातील वातावरणातील अचानक होणाऱ्या बदलांमुळे हे घडत असते. पण चिंता करण्याचे कारण नाही. टोमॅटोचे भाव लवकरच कमी होतील, असेही कुमार यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update: माॅन्सून गोव्यात दाखल; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Agriculture Workshop: सघन कापूस लागवडीवर केळीवेळी येथे मार्गदर्शन

Jalyukt Shivar Abhiyan: 'एल निनो'चं संकट; 'जलयुक्त शिवार'साठी १७० कोटी निधी, प्रत्येक जिल्ह्याला मिळणार ५ कोटी

Fertilizer Shop License Suspension: अकोला जिल्ह्यात सात कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द

Fertilizer Complaints Helpline: खतविषयक तक्रार निवारणासाठी तालुकानिहाय हेल्पलाइन सुविधा

SCROLL FOR NEXT