Tomato Price : भारताचा टोमॅटो पाकिस्तानला निर्यात, भाव वाढल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा

sandeep Shirguppe

शेतकऱ्यांना दिलासा

टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत असल्याने देशभरातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु महाराष्ट्रात उत्पादन घटले असल्याने शेतकऱ्यांना फारसा फायदा होणार आहे.

दक्षिणेतील राज्यात सर्वाधीक उत्पादन

टोमॅटोचे सर्वाधीक उत्पादन दक्षिणेकडील राज्यात होत आहे. तर सध्या टोमॅटोला ८० ते ९० किलोच्या विकला जात आहे.

tomato rate | agrowon

भारताचा टोमॅटो पाकिस्तानला निर्यात

दरम्यान भारतातील टोमॅटो पाकिस्तानात निर्यात होत असल्याने मालाला चांगला दर मिळत आहे. यामुळे अनेक राज्याना याचा मोठा फायदा होत आहे.

Tomato Rate | agrowon

पूर्व विदर्भात उत्पादन घटले

पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचा व्यवसाय केला जातो. दरम्यान मागच्या दोन महिन्यात भाजीपाल्यांची लागवड खूपच कमी झाली आहे. यातील टोमॅटोची लागवड कमी प्रमाणात झाली.

Tomato Rate | agrowon

पावसाचा पिकांवर परिणाम

याचबरोबर राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहेत. यामुळे कित्येक ठिकाणी जास्त पाऊस झाल्याने काही प्रमाणात शेती पिकांचे मोठे नुकसान होते याचा परिणाम थेट पालेभाज्यंवर होते यामुळे १५ दिवसांत टोमॅटो ८० रुपयांवर पोहोटला आहे.

Tomato Rate | agrowon

दक्षिणेतून विदर्भात आयात

दक्षिणेतील आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा या राज्यातून भंडाऱ्यासह पूर्व विदर्भात टोमॅटोची आयात होत आहे.

Tomato Rate | agrowon

भडारा जिल्ह्यात सर्वाधीक मागणी

भंडारा जिल्ह्यात मागच्या चार दिवसात दिवसाला १० हजार कॅरेट टोमॅटोची गरज भासत आहे. मात्र, पाकिस्तानातील निर्यात वाढल्याने भंडारा जिल्ह्याला केवळ तीन हजार कॅरेट्स पुरवठा होत आहे.

Tomato Rate | agrowon

एका कॅरेटला २ हजार भाव

पाकिस्तानात टोमॅटो जात असल्याने आणि पूर्व विदर्भातील मागणी बघता टोमॅटोचे दर प्रति कॅरेट दोन हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

Tomato Rate | agrowon

पंधरा दिवसात भाव वाढ

पंधरा दिवसांपूर्वी एका कॅरेटला ३०० रुपये मोजावे लागत होते, ते आता तब्बल १७०० रुपयांनी वाढले असल्याने प्रति किलोचा दरही १० रुपयांवरून थेट ९० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

Tomato Rate | agrowon

पालेभाज्यांचाही दर वाढला

टोमॅटोसह अन्य पालेभाज्यांच्या दरातही मोठ्या दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसताना दिसत आहे.

Tomato Rate | agrowon
monsoons | agrowon
आणखी पाहा...