Mango
Mango Agrowon
ॲग्रोमनी

शेवटच्या टप्प्यात कोकणातून हापूसची आवक वाढली

टीम ॲग्रोवन

रत्नागिरी ः बागायतदारांच्या अंदाजानुसार शेवटच्या टप्प्यात हापूसची आवक वाढली आहे. सर्वसामान्यांना परवडेल असे फळ मिळत असल्यामुळे बाजारामध्ये आर्थिक उलाढाल वाढली आहे. पाच, सहा डझनाच्या पेट्या बाजारात विक्रीसाठी पाठवल्या जात आहेत.

निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात झालेली घट, हंगामाच्या सुरुवातीला वाढलेली मागणी यामुळे फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्याचा बाजारपेठेत एक वेगळाच तोरा होता. उत्पादन घटल्यामुळे यंदा सर्वसामान्यांना चव चाखायला मिळणार की नाही अशी स्थिती निर्माण झाली होती. व्यापाऱ्यांनी वर्तवलेला अंदाज अखेर खरा उतरला आहे. एप्रिलनंतर तिसऱ्या मोहराचे उत्पादन वाढेल, असा अंदाज अक्षय तृतीयेच्या दरम्यानच वर्तवण्यात आला होता. त्यानुसार उत्पादनात वाढ झाली असून मागणीही घटली आहे. त्यामुळे १ डझन आंब्यासाठी सुरुवातीला ग्राहकांना १ हजारांहून अधिक रुपये मोजावे लागत होते. पण आता आवक वाढल्याने डझनभर आंब्यासाठी १५० ते ४०० रुपयेच मोजावे लागत आहेत. हंगामाच्या अंतिम टप्प्यात का होईना सर्वसामान्यांना हापूस आंब्याची चव चाखायला मिळतेय हे महत्त्वाचे. शिवाय दर कमी झाल्याने कोकणातील आंबा उत्पादकांनी माल मार्केटमध्ये पाठवण्याऐवजी जागेवरच कंपन्यांना विकण्यास प्राधान्य दिले आहे.

एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मुंबई मार्केटमध्ये हापूसची आवक सुरू झाली होती; मात्र पुरवठा अधिक आणि मागणी कमी अशी झाल्याने दर घटले आहेत. काही दिवसांपूर्वी हापूसची एक पेटी ही ३ हजार ५०० रुपयांपर्यंत विकली जात होती. आता आवक वाढल्याने दर १ हजार ते २ हजार रुपयांवर आहे. त्यामुळे वाहतुकीचा खर्च टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी थेट ज्यूस बनवणाऱ्या कंपन्यांना जागेवर आंबा विक्रीला प्राधान्य दिले आहे. निर्यातीमधून आंबा उत्पादकांना अधिक फायदा होत होता, पण दुबईतील दर घसरले असून त्यापेक्षा वाहतुकीलाच अधिक खर्च येत आहे. दुबई येथील मार्केटमध्ये १ डझन आंबा ५४० रुपयांना मिळतो तर तोच आंबा निर्यातीसाठी ६६० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी तोटा सहन करू शकत नाहीत. त्यामुळे कोकणातून हो‍णाऱ्या निर्यातीवर परिणाम झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

Mango Season : आंबा विक्रीतून एक कोटी ६३ लाखांची कमाई

Climate Change : बदलत्या हवामानामुळे ‘ग्रीन नेट’ला मरगळ

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT