Ethanol Production Agrowon
ॲग्रोमनी

इथेनॉलची सुवर्णसंधी शाश्वत नाही; नरेंद्र मुरकुंबी

इथेनॉलच्या खपासाठी ‘फ्लेक्स’ तंत्रावर आधारित वाहने विकसित करण्याची गरज आहे. अर्थात, जागतिक बाजारात डिझेल-पेट्रोलचे बाजार कमी होताच इथेनॉलचे दर कमी होतील.

अॅग्रोवन वृत्तसेवा

पुणेः भारतातील साखर उद्योगासाठी इथेनॉल उत्पादनाची सुवर्णसंधी आहे. मात्र, ही संधी अजिबात शाश्वत स्वरुपाची नाही. त्यामुळे पुढील १०-१५ वर्षांनंतर इथेनॉलकडून पुन्हा अन्य पर्यायांचा विचार करावा लागेल,” असा इशारा रवींद्र एनर्जीचे संचालक नरेंद्र मुरकुंबी यांनी दिला.

राज्यस्तरीय साखर परिषदेच्या समारोपाचे प्रमुख वक्ते म्हणून मुरकुंबी यांनी अभ्यासपूर्ण भाषण चर्चेचा विषय ठरले. “ यंदा ३२० लाख टन साखर उत्पादन घेणाऱ्या ब्राझिलला मागे टाकून ३६० लाख टन उत्पादन करणारा भारत हा इतिहास घडवतो आहे. जगातील युद्धजन्य स्थिती आणि ब्राझीलमधील कमी साखर उत्पादनामुळे यंदा भारतीय साखर विकली गेली.

मात्र, जगात शांततेचे पर्व सुरू होताच साखरेचे बाजार घसरतील,” असा इशारा त्यांनी दिला. आगामी हंगामात उत्तरप्रदेशसह महाराष्ट्रातही ऊस उत्पादन जादा असेल. त्यामुळे आपल्याला इथेनॉल निर्मिती हाच भक्कम पर्याय आपल्या हाती आहे.

इथेनॉलच्या खपासाठी ‘फ्लेक्स’ तंत्रावर आधारित वाहने विकसित करण्याची गरज आहे. अर्थात, जागतिक बाजारात डिझेल-पेट्रोलचे बाजार कमी होताच इथेनॉलचे दर कमी होतील. कारण, यापुढे सर्व जग इलेक्ट्रिक उर्जेकडे जात आहे. पुढील १० वर्षे इथेनॉल आधारित वाहने चालू राहतील. तो आपल्यासाठी सुवर्ण काळ असेल. मात्र, त्यानंतरचे जग इलेक्ट्रिक वाहनांचे असेल. त्यामुळे इथेनॉल हा कायमस्वरूपी पर्याय नाही, असा इशारा मुरकुंबी यांनी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : मूग, उडीद, तुरीच्या पेरण क्षेत्रात घट

Costal Safety : काशीदला ‘बंधाऱ्या’चे सुरक्षा कवच

Pune Dams: पुणे जिल्ह्यातील धरणांत ८० टक्के पाणीसाठा

Dhamani Dam : धामणी धरणात सव्वा टीएमसी पाणीसाठा

Loan Waiver Promise: अजितदादांच्या सासुरवाडीतूनच कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT