Cotton
Cotton  Agrowon
ॲग्रोमनी

कापूस उत्पादक गावांत ‘फरदड मुक्त गाव’ संकल्पना

Mahesh Gaikwad

नाशिक : जिल्ह्यात मालेगाव, नांदगाव, सटाणा व येवला या तालुक्यांत साधारण ३४ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर मागील हंगामात कापसाची लागवड करण्यात आली. त्यास चांगला भाव मिळाल्याने या क्षेत्रात १० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानुसार एप्रिल महिन्यात प्रत्येक कापूस उत्पादक गावात ‘फरदड मुक्त गाव’ ही संकल्पना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. कापूस उत्पादनाशी निगडित सर्व यंत्रणा, बियाणे उत्पादक कंपन्या, कीडनाशक कंपन्या, कापूस खरेदी केंद्र, जिनिंग प्रोसेसिंग मिल यांच्या सहभागाने ही मोहीम राबवावी, असे उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे यांनी कळविले.

शेतकऱ्यांनी कापूस पीक जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात शेतात ठेवलेले होते. लांबलेला कापूस हंगाम व कापूस पिकाचे अवशेष शेतात राहिल्यामुळे किडीचा जीवनक्रम अखंडित राहण्याची शक्यता, यामुळे चालू खरीप हंगामात प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवणे व चालू वर्षी होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी एप्रिल व मे महिन्यांत जमिनीची खोल नांगरट करून कापूस पिकाची पूर्वहंगामी मे महिन्यातील लागवड टाळावी. शेत ५ ते ६ महिने कापूसविरहित ठेवावे. त्यामुळे डिसेंबरनंतर खाद्य न मिळाल्यास बोंड अळी सुप्त अवस्थेत जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी फरदड घेणे टाळावे, असे आवाहन देवरे यांनी केले.

मागील वर्षात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव शासकीय कृषी विभाग व खासगी संस्था, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, जिनिंग प्रोसेसिंग मिल, बियाणे विक्रेते व बियाणे कंपन्यांच्या सहकार्याने नियंत्रणात ठेवण्यात यश आले. त्यामुळे ‘फरदड मुक्त गाव’ संकल्पना राबवावी, असे आवाहन देवरे यांनी केले.

...असे करा नियोजन

कापसाच्या पऱ्हाट्या बांधावर ठेवू नयेत. शेत व बांध स्वच्छ ठेवावेत. पऱ्हाट्या रोटाव्हेटर किंवा थ्रेडरद्वारे जमिनीत गाडाव्यात अथवा जाळाव्यात. कापसाची वेचणी झाल्यानंतर हंगामाच्या शेवटी शेतात शेळ्या, मेंढ्या व इतर जनावरे चरण्यासाठी सोडावीत, विविध संकरित वाणांची लागवड न करता गावनिहाय एकाच वाणाची एकाच वेळी लागवड करावी, असेही देवरे यांनी कळविले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Tourism Festival : ग्रामसंस्कृतीतून राज्यात कृषी पर्यटनाला सुवर्णसंधी

Cotton Variety : एका कापूस वाणाची जादा दराने विक्री

Hailstorm : माण तालुक्यात बिजवडी, जाधववाडी परिसरात गारपीट

Agriculture Input Seized : अप्रमाणित निविष्ठा प्रकरणी वर्षभरात ७२ फौजदारी गुन्हे

Water Scarcity : इंदापूर तालुक्यात टँकरची मागणी वाढली

SCROLL FOR NEXT