soybean AGROWON
ॲग्रोमनी

TOP 5 NEWS -ब्राझीलमध्ये पुढील हंगमात सोयाबीन पेरणी वाढणार?

चालू हंगामात सोयाबीन जागतिक पातळीवर चांगला दर मिळाला. अद्यापही सोयाबीन दर तेजीत आहेत. त्यामुळे भारतासही सर्वंच उत्पादक देशांत सोयाबीन पेरणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Team Agrowon

1. बंगालच्या उपसागरात आलेल्या 'असानी' चक्रीवादळाच्या प्रभावामुळं राज्यात ढगाळ वातावरण होतंय. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत ब्रह्मपूरी इथ उच्चांकी ४४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीये. उद्या राज्यात ढगाळ हवामानाचा अंदाजये. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अन् विदर्भात उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागानं दिलाय. राज्यात ढगाळ हवामानामुळं ऊन सावल्यांचा खेळ सुरूये. विदर्भात उन्हाचा चटका अधिक असून, ब्रह्मपुरीसह अकोला, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती इथं तापमान पुन्हा ४४ अंशांच्या पुढे गेलंय.

2. चालू हंगामात साखरेचं विक्रमी उत्पादन झालंय. पण निर्यातही जोमात सुरुये. त्यामुळे उत्पादन वाढूनही साखरेच्या दरावर दबाव आला नाही. एप्रिल महिन्यापर्यंत देशात ३४२ लाक टन साखर उत्पादन झालंय. गेल्यावर्षी याच काळात ३०० लाख टन उत्पादन होतं. म्हणजेच यंदा उत्पादनात ४२ लाख टनांनी वाढ झाली. अजूनही बऱ्याचं कारखान्यांचं गाळप सुरुचये. त्यामुळं यंदाच्या संपूर्ण हंगामात ३५५ लाख टन साखर उत्पादन होती येईल, असा अंदाजये. असं झाल्यास हे उत्पादन आत्तापर्यंतच विक्रमी ठरेल. पण साखरेचे भाव मात्र दबावात आले नाही. निर्यातीला असलेली मागणी अन् आंतरराष्ट्रीय बाजारातील चढे दर यामुळे साखरेचे भाव टिकूनये.

3. इंडोनेशियानं पामतेल निर्यातबंदी केल्यानं भारताची कोंडी झाली. खाद्यतेलाची टंचाई कमी करण्यासाठी भारत मलेशियाकडून जास्त आयात करु शकतो. पण आत्तापर्यंत येथील तेलाच्या साठ्याबाबत अनिश्चितता होती. परंतु आता भारताला काहीअंंशी दिलासा देणारी बातमी आलीये. एप्रिल महिन्यात मलेशियात मार्चच्या तुलनेत पामतेलाचा साठा काहीसा वाढला. येथील पामतेलाचा साठा ५.२ टक्क्यांनी वाढून १५.५ लाख टनांवर पोचला, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. तर उत्पादन ५ टक्क्यांनी वाढून १४.५ लाख टन झालं. निर्यात मात्र ५.६ टक्क्यांनी घटून १२ लाख टनांवर आल्याचं येथील सरकारनं सांगितलं.

4. नाफेडनं यंदा हरभऱ्याची विक्रमी खरेदी केली. सरकारच्या आयातीनं बाजारात हरभरा दर दबावात आलेत. त्यातच कोरोना काळात डाळींचं वाटप जास्त झाल्यानं नाफेडचा साठा कमी झाला होता. त्यामुळे आवश्यक साठा निर्माण करण्यासाठी नाफेडनं आत्तापर्यंत १० लाख ५६ हजार टन खरेदी केली. देशात यंदा महाराष्ट्रात सर्वाधिक उत्पादन होण्याचा अंदाजये. मात्र नाफेडची सर्वाधिक खरेदी गुजरातमध्ये झाली. येथे नाफेडने ४ लाख ७० हजार टन खरेदी केली. तर महाराष्ट्रातील आकडा ४ लाख ५५ हजार टनांवर पोचला. त्यानंतर आंध्र प्रदेशात ८० हजार तर कर्नाटकात ७२ हजार टनांची खरेदी झाली. यामुळे खुल्या बाजाराला पुढील काळात आधार मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

5. एखाद्या मालाला चांगला भाव मिळाल की शेतकरी त्याचं उत्पादन वाढवतात. हा अनुभव आपण अनेकदा घेतला. याच हेच ब्राझीलमध्ये घडण्याची शक्यताये. चालू हंगामात ब्राझीलमधील शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी चांगला मिळतोय. ब्राझील आणि अर्जेंटीनातील घटलेलं उत्पादन, पामतेलाची टंचाई, रशिया-युक्रेन युद्धामुळं सूर्यफुल तेलाचा विस्कळीत झालेला पुरवठा आदी कारणांमुळे सोयाबीन दरात सुधारणा झाली. सोयाबीनचे भाव सध्याही तेजीत आहेत. त्यामुळे येथील शेतकरी सोयाबीन पेरणीसाठी उत्सुक दिसतायेत. चालू हंगामातही ब्राझीलमधील शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी साडेतीन टक्क्यांनी वाढवली होती. यंदा येथे ४०३ लाख हेक्टरवर सोयाबीन पीक होतं. मात्र अतिपाऊस अन् दुष्काळामुळं उत्पादन घटलं. पणं चांगला भाव मिळाल्यानं शेतकरी दीड ते दोन टक्क्यांनी सोयाबीनची लागवड वाढवतील, असा अंदाज येथील विश्लेषण संस्थांनी व्यक्त केलाय. ब्राझीलमधील हंगामचा विचार केला तर सप्टेंबरच्या मध्यापासून पेरणी सुरु होऊन डिसेंबरपर्यंत चालते. तर फेब्रुवारीपासून सोयाबीनची काढणी सुरु होते. तसेच मे महिन्याच्या मध्यापर्यंत काढणी पूर्ण केली जाते. कारण ब्राझीलमध्ये १५ मे ते १५ सप्टेंबर दरम्यान सोयाबीनमुक्त शेतीचा काळ असतो. या काळात कुणाच्याही शेतात सोयाबीन पीक दिसलं, तर शेतकऱ्याला दंड ठोठावला जातो. रस्ते आणि रेल्वे मार्गालगतचे जंगली सोयाबीन झाडेही काढली जातात. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात काहीसे चढउतार सुरु आहेत. मात्र भाव विशिष्ट पातळीपेक्षा कमी होत नाहीत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

SCROLL FOR NEXT