Chana Rate Agrowon
ॲग्रोमनी

Chana Procurement : अमरावतीत हरभरा खरेदीत पुन्हा दीड लाखाने उद्दिष्ट वाढ

Nafed Chana : नाफेडमार्फत हरभरा खरेदीचे उद्दिष्ट पुन्हा एकदा वाढवून देण्यात आले आहे.

Team Agrowon

Amravati Chana News : नाफेडमार्फत हरभरा खरेदीचे उद्दिष्ट पुन्हा एकदा वाढवून देण्यात आले आहे. दोन वेळा ही वाढ देण्यात आली असून, आता पुन्हा दीड लाख क्विंटल हरभरा आधारभूत किमतीने खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण ७ लाख ८८ हजार क्विंटल हरभरा खरेदी होत आहे.

नाफेडने रब्बी हंगामातील हरभरा आधारभूत किमतीने खरेदी सुरू केली होती. त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. ही नोंदणी करताना जिल्ह्यातील बहुतांश केंद्रांवर गोंधळ उडाला होता. जिल्हा मार्केटिंग, विदर्भ मार्केटिंग व महाएफपीसीमार्फत खरेदी करण्यात आली.

प्रारंभी जिल्ह्यात ५ लाख २२ हजार क्विंटल हरभरा खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले. ते पूर्ण होत आल्याने खरेदी थांबविण्यात आली.

मात्र नोंदणी केलेल्या बऱ्याच शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी झाला नव्हता. त्यामुळे निर्माण झालेला रोष व वाढती मागणी बघून नाफेडने पुन्हा १ लाख १६ हजार क्विंटल हरभरा खरेदी करण्याचे उद्दिष्ट वाढवून दिले.

ही खरेदी झाल्यानंतरही नोंदणीकृत शेतकरी शिल्लक राहिल्याने निर्माण होणारा संभाव्य रोष बघता नाफेडने आता पुन्हा दीड लाख क्विंटलने उद्दिष्ट वाढवून दिले आहे.

नाफेडमार्फत जिल्हा मार्केटिंग व विदर्भ मार्केंटिंगसह तत्सम यंत्रणांना उद्दिष्ट विभागून दिले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT