Soybean Rate
Soybean Rate Agrowon
ॲग्रोमनी

Soybean Market : देशात सोयाबीन सुधारले; आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंड तेजीत

Anil Jadhao 

अनिल जाधव

पुणेः चालू आठवड्यात सोयाबीन (Soybean) आणि सोयापेंडच्या (Soyameal) दरात मोठ्या घडामोडी घडल्या.

आंतरराष्ट्रीय बाजारातही दरात (Soybean Rate) चढ उतार राहीले. मात्र सरासरी दरपातळी वाढली होती.

तर देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात क्विंटलमागं सरासरी ३०० रुपयांची सुधारणा झाली होती. पुढील आठवड्यातही दर सुधारण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 


देशात सोयाबीनचे वायदे बंद आहेत. बाजार समित्यांमध्ये आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच सोमवारी सोयाबीनचा बाजार (Soybean Market) ४ हजार ८०० ते ५ हजार १०० रुपयांवर सुरु झाला होता.

मात्र बुधवारपासून सोयाबीन दरात काहीशी वाढ होत गेली. शुक्रवारी सोयाबीनचे सरासरी दर ५ हजार १०० ते ५ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान होते. म्हणजेच सरासरी सरासरी ३ रुपयांपर्यंत सुधारणा पाहायला मिळाली.

भारतात सोयापेंडचे भाव या आठवड्यात काहीसे सुधारले होते. सरासरी ४१ हजार रुपये प्रतिटनानं सोयापेंड विकलं जातं होतं.

पण शुक्रवारपर्यंत सोयापेंडचा भाव ४ हजार ३०० रुपयांपर्यंत वाढला. मात्र तरीही देशातील सोयापेंडचे दर आंतरराष्ट्री बाजारातील दरापेक्षा कमीच होते.

त्यामुळे देशातून सोयापेंड निर्यात जोमात सुरु आहे. सोयापेंड निर्यातीचाच बाजाराला आधार मिळाल्याचं सांगितलं जातं.

सोयाबीन वायदे वाढले
आंतरराष्ट्रीय बाजारात चालू आठवड्यात मोठे चढ उतार राहीले. सोयाबीनचे वायदे सोमवारी १५.३० डाॅलर प्रतिबुशेल्सवर सोयाबीनचा बाजारा सुरु झाला होता.

रुपयात सांगायचं झाल तर बाजार ४ हजार ६३६ रुपयांवर सुरु झाला. त्यानंतर मात्र दरात चढ उतार झाले.

बुधवारी सोयाबीनने निचांकी १५.१० डाॅलरचा टप्पा गाठला होता. तर शुक्रवारी बाजार १५.४३ डाॅलरवर म्हणजेच ४ हजार ६७५ रुपयांवर बंद झाला. याचाच अर्थ असा की सोयाबीनच्या वायद्यांमध्ये ३९ रुपयांची सुधारणा झाली.

सोयापेंड तेजीत
सोयापेंडचा बाजार मात्र तेजीतच राहीला. सोमवारी सोयापेंडचे वायदे ४९५ डाॅलर प्रतिटनावर सुरु झाले. त्यानंतर मात्र दरात मोठे चढ उतार झाले.

सोयापेंडने बुधवारी निचांकी ४७९ डाॅलरचा टप्पा गाठला होता. त्यानंतर दरात सुधारणा होता शुक्रवारी वायद्यांनी ५०० डाॅलरचा टप्पा गाठला होता.

चालू हंगामातील हा सर्वाधिक दर होता. मात्र वायदे जवळपास ४९९ डाॅलरवर बंद झाला. म्हणजेच चालू आठवड्यात सोयापेंडचे वायदे ४ डाॅलरने वाढले.

दर सुधारणेला वाव

चालू आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे दर वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढल्याने सोयापेंड तेजीत आले.

भारतातूनही सोयापेंड निर्यात वाढली. खरं तर भारताचं सोयापेंड सध्या अमेरिका आणि अर्जेंटीनाच्या सोयापेंड दरापेक्षा स्वस्त आहे. त्यामुळं भारतीय सोयापेंडला मागणी वाढली.

देशातही चालू आठवड्यात सोयाबीन दरात सरासरी ३०० रुपयांची सुधारणा झाली. त्यामुळे पुढील आठवड्यातही सोयाबीन दरात वाढ दिसू शकते.

यंदा सोयाबीनची भावपातळी ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT