Cotton Market  Agrowon
ॲग्रोमनी

Cotton Market : कापूस दरातील नरमाई कायम

Anil Jadhao 

अनिल जाधव

पुणेः देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून कापसाचे भाव (Cotton Rate) नरमले आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात दरपातळी कायम आहे.

देशात कापूस स्वस्त झाल्यानं निर्यातही (Cotton Export) वाढत आहे. तर केवळ भारतातच नाही तर इतर देशांमध्येही कापसाचे भाव वाढलेले आहेत.

त्यामुळे देशातील कापसाची दरपातळी जास्त दिवस दबावात राहणार नाही, असे कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितले. 


देशातील बाजारात कापसाच्या दरात नरमाई आहे. कापसाचे दर मागील काही दिवसांपासून कमी होत आहेत. आजही काही बाजारांमध्ये कमाल दरात क्विंटलमागं काहीशी घट झाली.

त्यामुळं सध्या देशातील कापसाची सरासरी दरपातळी सध्या ७ हजार ८०० ते ८ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहे. सध्या देशातील बाजारात कापसाची आवकही काहीशी वाढलेली आहे.

यंदा शेतकऱ्यांनी कापसाची विक्री टप्प्याटप्प्यानं केली. त्यामुळं बाजारावर आवकेचा दबाव नव्हता. पण सूत आणि कापडाला मागणी नसल्याचे कारण देत उद्योगांनी चढ्या दरात कापूस खेरदी कमी केली.

कापसाचे भाव कमी झाल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनीही कापसाची विक्री वाढवली. तसंच बाजारात दराबाबत संभ्रम निर्माण करणाऱ्या बातम्याही पसरवण्यात आल्या.

तसेच पैशांची गरज असलेले शेतकरी दर जास्त कमी होण्याच्या भीतीने कापूस विकतील, याचा अंदाज उद्योगांनाही होता. त्यामुळं बाजारात आवक वाढली आणि दरही दबावात आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती
आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर टिकून आहेत. काॅटलूक ए इंडेक्स १००.७० सेंट प्रतिपाऊंडवर होता.

रुपयात हा दर १९ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल होतो. तर देशातील रुईचे दर १७ हजार ५०० रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात वायद्यांमध्ये मात्र दरात चढ उतार सुरुच आहेत.

आज दुपारी ३ वाजेपर्यंत कापसाचे वायदे ८४.४० सेंट प्रतिपाऊंडवर होते.

देशातील कापूस स्वस्त
सध्या देशातील कापसाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील प्रत्यक्ष खरेदीतील दरापेक्षा कमी आहेत. दरातील फरक जवळपास २ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील वायद्यांमधील दर कमी असले तरी वायदे मार्च महिन्यातील आहेत. भारतात मात्र अद्याप वायदे सुरु झाले नाहीत.

त्यामुळं देशातील प्रत्यक्ष खेरदीतील दर आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील प्रत्यक्ष खेरदीतील दर, याची तुलना व्हायला हवी.

काय आहे परिस्थिती?
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची दरपातळी टिकून आहे. तर चीनची मागणीही वाढत आहे. बांगलादेश आणि पाकिस्तानमधील कापड उद्योगाकडून कपसाला उठाव मिळत आहे.

त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला उठाव आहे. परिणामी कापसाचे दर टिकून आहेत. भारतातूनही कापसाची निर्यात सुरु झाली आहे.

त्यामुळं पुढील काळात कापसाचे दर वाढण्यास पोषक स्थिती आहे. यंदाच्या हंगामाचा विचार करता कापसाची सरासरी दरपातळी ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT