Chana
Chana  Agrowon
ॲग्रोमनी

Chana Preachment Registration : हमीभावाने हरभरा विक्रीसाठी ८ हजार ७२५ शेतकऱ्यांची नोंदणी

Team Agrowon

Chana MSP : परभणीत केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत (एमएसपी) (MSP) खरेदी योजनेअंतर्गत या वर्षीच्या (२०२२-२३) हंगामात हमीभावाने (प्रतिक्विंटल ५३३५ रुपये) हरभरा खरेदीसाठी भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघाने (नाफेड) (Nafed) मंजुरी दिलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ (मार्केटिंग फेडरेशन) अंतर्गत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात १५ आणि दि विदर्भ सहकारी पणन महासंघ (व्हीसीएफ) अंतर्गत परभणी जिल्ह्यात १ अशा एकूण १६ केंद्रांवर शुक्रवार (ता. १०) पर्यंत ८ हजार ७२५ शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली आहे. मंगळवार (ता. १४) पासून खरेदी, तर गुरुवार (ता. १५) पर्यंत ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना पणन विभागातर्फे देण्यात आलेल्या आहेत.

राज्य सहकारी पणन महासंघ अंतर्गत परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, सोनपेठ, पूर्णा या ६ खरेदी केंद्रांना आधी, तर बोरी (ता. जिंतूर) आणि पाथरी या २ केंद्रांना नंतर मंजुरी मिळाली.

हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, वसमत, जवळा बाजार (ता. औंढा नागनाथ), सेनगाव या ५ केंद्रांना आधी, तर कनेरगाव, साखरा या २ केंद्रांना नंतर मंजुरी मिळाली. या दोन जिल्ह्यांतील १५ केंद्रांवर नोंदणी सुरू आहे.

शुक्रवार (ता. १०) पर्यंत परभणी तील ८ केंद्रांवर ३ हजार शेतकऱ्यांची आणि हिंगोलीतील ७ केंद्रांवर ४ हजार शेतकऱ्यांनी अशी एकूण ८ हजार शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली, असे जिल्हा पणन अधिकारी के. जे. शेवाळे यांनी सांगितले.

विदर्भ सहकारी पणन महासंघातर्फे हरभरा खरेदीसाठी परभणीतील गंगाखेड येथे खरेदी केंद्रावर १ हजार ४०६ शेतकऱ्यांनी नोंदणी अर्ज सादर केले त्यापैकी २०६ ऑनलाइन नोंदणी झाली, असे सोळंके यांनी सांगितले.

मंगळवारपासून खरेदी सुरू होणार...

मंगळवारी (ता. १४) हरभरा खरेदीस सुरुवात होईल. त्यासाठी ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना संबंधित खरेदी केंद्रावर हरभरा विक्रीसाठी आणण्यासाठी एसएमएस द्वारे संदेश पाठविण्यात येतील, असे सूत्रांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने अर्ज सादर केले आहेत. परंतु हे अर्ज पोर्टलवर ऑनलाइन करण्याच्या प्रक्रिया वेगवान नाही.

परभणी, हिंगोली जिल्हा ऑनलाइन शेतकरी नोंदणी स्थिती

केंद्राचे नाव - शेतकरी नोंदणी -- प्रलंबित एसएमएस

परभणी ३३२ ३३२

जिंतूर ३६३ ३६३

बोरी ४६९ ४६९

सेलू १४३१ १४६१

मानवत ४९६ ४९६

पाथरी ११४ ११४

सोनपेठ २६८ २६८

पूर्णा ४३० ४३०

हिंगोली १२१० १२१०

कनेरगाव ५६ ५६

कळमनुरी ६७९ ६७९

वसमत ५५२ ५५२

जवळा बाजार १३३५ १३३५

सेनगाव ७६२ ७६२

साखरा २२ २२

गंगाखेड २०६ २०६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT