Palm oil mission 
ॲग्रोमनी

पाम मिशन असेल मोठे आव्हान

देशात खाद्यतेलाची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. प्रक्रियायुक्त पदार्थ्यांना मागणी वाढत असल्याने तेलालाही उठाव मिळत आहे. खाद्यतेलाची वाढती बाजारपेठ शेतकऱ्यांचे उत्पन्नवाढीसाठी फायदेशीर आहे.

अनिल जाधव

पुणेः देशाची खाद्यतेल आयात (Edible oil import) कमी करण्यासाठी खाद्यतेल मिशन सुरु केले. मात्र पाम लागवड वाढविणे सोपे नसेल. शेतकऱ्यांना पिकाचे अर्थकारण समजावण्यापासून ते बाजार उपलब्धतेपर्यंत काम करावे लागले. शेतकऱ्यांना पाम नर्सरी ते प्रक्रिया प्लांट्सची शाश्वती दिली तरच हे शक्य होईल, असं जाणकारांनी सांगितले.

देशात खाद्यतेलाची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. प्रक्रियायुक्त पदार्थ्यांना मागणी वाढत असल्याने तेलालाही उठाव मिळत आहे. खाद्यतेलाची वाढती बाजारपेठ शेतकऱ्यांचे उत्पन्नवाढीसाठी फायदेशीर आहे. भारताने मागील वर्षात १ लाख १७ हजार कोटींचे खाद्यतेल आयात केले. त्यामुळे खाद्यतेल आयातीवरील अवलंबित्व कमी करणे गरजेचे आहे. यासाठी सहा महिन्यांपूर्वी सरकारने खाद्यतेल मिशन (Edible oil Mission) जाहिर केले. तेलबिया आणि पाम उत्पादनवाढीचे उद्दीष्ट यामागे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांऐवजी पाम सारख्या पिकांकडे वळण्याची आवश्यकता आहे.

देशात मागील तीन दशाकांमध्ये पाम तेल उत्पादन (Palm oil production) कमी जास्त होत राहिले. तसचं पाम लागवड धिम्या गतीने झाली. १९९१-९२ मध्ये ८ हजार ५८५ हेक्टरवर पाम लागवड होती. ती २०२२ पर्यंत ३ लाख ८६ हजार ७०० रुपयांवर पोचली. भविष्यात पाम लागवड वाढीसाठी ही एक सुरुवात असू शकते. तसेच सरकारचा पाठिंबाही आवश्यक आहे. सध्या देशातील पाम उत्पादकता प्रतिहेक्टरी १० टन आहे. ती २० टनांवर पोचण्याची आवश्यता आहे. उत्पादकता वाढत असताना मूल्यवर्धन साखळी विकास होणे गरजेचे आहे. सध्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील शेतकऱ्यांना हेक्टरी २० टन उत्पादन मिळत आहे. हे उत्पादन जागतिक सरासरीऐवढे आहे. या दोन्ही राज्यांतील शेतकऱ्यांनी तेल पाम पीक स्वीकारले आहे. इतर राज्यांत पाम लागवड वाढ करणे तेवढे सोपे नाही. त्यामुळे पाम लागवड करताना पाण्याची उपलब्धता तपासणे आवश्यक आहे. तसेच त्या भागात उत्पादकता कमी असल्यास पाम शेतीत गुंतवणूकही कमीच होईल. ईशान्य भारतात पाम लागवड वाढीत मोठ्या समस्या असतात. या भागात पायाभूत सुविधा आणि रस्त्यांचे जाळे विखूरलेले नाहीत. तसेच येथील शेतकरी पाम पिकाला स्वीकारतील, याची शाश्वतीही नाही. पाम शेतीचा खर्चही अधिक आहे. सर्वात महत्वाचा प्रश्न याभागात मार्केटचा असेल. राष्ट्रीय खाद्यतेल मिशन-तेल पाम (National Edible oil mission-Oil Palm) २०२१-२२ ते २०२५-२६ राबविले जाणार आहे. या मिशनमधून पाम लागवडीसाठी केंद्र ६० टक्के आणि राज्य ४० टक्के निधी देणार आहे. तर ईशान्य भारतात केंद्र ९० टक्के निधी देईल. या मिशनमधून पहिल्यांदाच पामला किंमतीची शाश्वती दिली आहे. प्रक्रियादाराने शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय दरापेक्षा कमी दर दिल्यास ही तफावत सरकार भरून काढेल. पण राज्य मिशनमध्ये सहभागी झालेल्यानंतरच हा लाभ मिळेल. तसेच वाढत्या उत्पादन खर्चही वाढत आहे. खत निर्मितीचा खर्च, प्लांट मटेरियल खर्च, सिंचन खर्च वाढत आहे. पुढील वर्षभर तरी पाम तेल दर अधिक राहण्याची शक्यता आहे. सध्या खाद्यतेलाची मागणी वाढली आहे. त्यातच इंडोनेशिया आणि मलेशियात पाम उत्पादन घटले. त्यामुळे दरात मोठी वाढ झाली आहे.

व्हिडीओ पाहा -

आवश्यक धोरण पामतेल लागवड (Palm oil production) वाढीसाठी रोपांच्या नर्सरी उभारणे आवश्यक आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांना पाम लागवडीचे नियोजन करता येईल. तसेच शेतकऱ्यांना पाम पिकाचे अर्थकारण समजावून सांगावे लागेल. शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे लागेल. शेतकऱ्यांनी पाम लागवड केल्यास प्रक्रिया प्लांट्स आवश्यक आहेत. असे झाले तरच देशात पाम लागवड वाढले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mixed Cropping Model : अल्पभूधारकांसाठी ठरतेय मिश्र पीक पद्धती फायदेशीर

Reshim Sheti Success : रेशीम शेतीतून मिळाली शाश्‍वती

Livestock Management: उत्तम आरोग्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरणाला प्राधान्य

Poultry Farming: देशी कोंबड्यांचे आहार व्यवस्थापन

Tomato Onion Prices: आंध्र प्रदेशात कांदा, टोमॅटोचे भाव पडल्याने शेतकऱ्यांचा आक्रोश; टोमॅटो फेकून देण्याची वेळ

SCROLL FOR NEXT