Non-Basmati Rice
Non-Basmati Rice Agrowon
ॲग्रोमनी

भारताच्या बिगर बासमती तांदळाची निर्यात ६ अब्ज डॉलर्सवर!

Team Agrowon

भारताच्या बिगर बासमती तांदळाच्या (Non-Basmati Rice) निर्यातीत गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढ झाली असून २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात भारताने ६.११ अब्ज डॉलर्सचा बिगर बासमती तांदूळ निर्यात केला असल्याचे केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

२०१३-२०१४ दरम्यान भारताच्या बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीचे प्रमाण २.९२ अब्ज डॉलर्सवर होते. २०२०-२०२१ मध्ये भारताने ६.११ अब्ज डॉलर्सचा बिगर बासमती तांदूळ निर्यात केला आहे. २०२०-२०२१ मध्ये भारताने जगभरातल्या १५० देशांना बिगर बासमती तांदूळ पुरवला आहे.

व्यावसायिक वार्ता व सांख्यिकी महासंचलनालयाच्या आकडेवारीनुसार (DGCIS) २०१९-२०२० या आर्थिक वर्षात भारताने २ अब्ज डॉलर्सचा बिगर बासमती तांदूळ निर्यात केला होता. २०२०-२०२१ या आर्थिक वर्षातील भारताच्या बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीचे प्रमाण ४.८ अब्ज डॉलर्सवर गेले आणि २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात भारताची बिगर बासमती तांदूळ निर्यात ६.११ अब्ज डॉलर्सवर गेली आहे.

तांदूळ निर्यातीचे प्रमाण वाढवण्यासाठी संबंधित देशांसोबत वाहतूकीच्या सुविधा उपलब्ध करण्यासोबतच उत्पादनाचा दर्जा उंचावण्यावर भर देण्यात आल्याचे अपेडाचे (APEDA) अध्यक्ष एम. अंगमुथू (M. Angamuthu) यांनी म्हटले आहे.

नेपाळ, बांगलादेश, चीन, कोट डील्व्होरी, टोगो, सेनेगल, व्हिएतनाम,मादागास्कर, सोमालिया, मलेशिया, डिजिबोटी, सौदी अरेबिया, सौरी अरब अमिराती, गुइनीआ, पश्चिम आफ्रिकन देश बेनिन इत्यादी देशांत भारताकडून बिगर बासमती तांदूळ पुरवला जातो.

पश्चिम बंगाल, पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, बिहार,छत्तीसगड, ओडिशा, आसाम हे भारतातील तांदूळ उत्पादक राज्य आहेत. २०२१-२०२२ या आर्थिक वर्षातील भारताचे एकूण तांदूळ उत्पादन १२८ दशलक्ष टनांवर जाण्याचा अंदाज सरकारकडून वर्तवण्यात आला आहे. त्यापूर्वीच्या पाच वर्षांतील एकूण तांदूळ उत्पादनाची सरासरी ११६ दशलक्ष टन राहिली आहे. तांदूळ उत्पादनात जगात चीन खालोखाल भारताचा क्रमांक लागतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT