Indian Mango Agrowon
ॲग्रोमनी

भारताचे आंबे युरोपात: बेल्जीयम येथे आंबा महोत्सवाचे आयोजन

भारतीय आंब्याला युरोपियन युनियनमधील बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी तसेच युरोपमधील आंबाप्रेमींना भारतीय आंब्यांची माहिती करून देण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला.

Team Agrowon

भारतीय आंब्यांना (Indian Mango) युरोपमधील व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय दूतावासातर्फे बेल्जीयम (ब्रुसेल्स) येथे आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते शुक्रवारी (१८ जून) या आंबा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

भारताचे आंबे जगभरात निर्यात केले जातात. यातील बहुतांशी आंबे युरोपमध्ये जाण्याऐवजी मध्य-पूर्वेतील देशात जातात. भारतीय आंब्याला युरोपियन युनियनमधील बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी तसेच युरोपमधील आंबाप्रेमींना भारतीय आंब्यांची माहिती करून देण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला. वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

बेल्जीयम,लक्झेम्बर्ग आणि युरोपियन युनियनमधील भारताचे राजदूत संतोष झा यांनी हा आंबा महोत्सव आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला. युरोपमधील बाजारपेठेत भारतीय आंब्यांना मोठी मागणी मिळू शकते. इथल्या आंबाप्रेमी नागरिकांना भारतातील आंब्यांचे प्रकार, त्यांच्या चवींची माहिती नाही. त्यामुळेच हा महोत्सव आयोजित करण्यात आल्याचे झा म्हणालेत.

इथल्या नागरिकांना भारतीय आंब्यांची (Indian Mango) चव कळली, त्यांची गोडी लागल्यास भारतातून युरोपयन देशात आंबा निर्यात करणे शक्य होणार असल्याचे झा यांनी नमूद केले. आंध्र प्रदेशातील बेंगणपल्ली, उत्तर प्रदेशातील मलिहाबाद दशेरी, ओडिशा येथील आम्रपाली, लक्ष्मणभोग, हिमसागर,जर्दाळू, लंगरा अशा १२ प्रकारचे आंबे या महोत्सवात विक्रीसाठी ठेवण्यात आले.

भारत आणि युरोपियन युनियनमधील मुक्त व्यापार वाटाघाटीची (FTAs) सुरुवात आम्ही मँगो मानियापासून केल्याचे झा म्हणाले. या वाटाघाटी २०१३ मध्ये स्थगित करण्यात आल्या होत्या. आता आपण नव्याने त्या लागू करण्यासाठी बोलणी करत आहोत. अनेक तांत्रिक मुद्यावर चर्चा होईल.भारताने नव्या दृष्टीकोनातून मुक्त व्यापार कराराकडे पहायला सुरुवात केली आहे, त्यामुळे खूप सकारात्मक वातावरणात या वाटाघाटी होतील,अशा आशावाद झा यांनी व्यक्त केला.

युरोपमध्ये इंग्लंड आणि जर्मनी हे दोन देश भारताची बाजारपेठ आहेत. बेल्जीयममधील आंबा महोत्सवामुळे युरोपियन लोकांना भारतात पिकणाऱ्या विविध प्रकारच्या आंब्यांची माहिती मिळेल. भारतीय आंब्यांना युरोपियन बाजारपेठ मिळवून देण्यासाठीचा या प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न आहे. या आंबा महोत्सवामुळे भारतीय आंबा निर्यातदार आणि युरोपियन आंबा खरेदीदारांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार होतील अन युरोपियन आंबाप्रेमींना भारतीय आंबे उपलब्ध होतील, असा विश्वास भारतीय दूतावासाच्या कृषी व समुद्री उत्पादने सल्लागार डॉ. स्मिता सिरोही यांनी यावेळी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT