क्रमिक पुस्तकातून विद्यार्थ्यांना नैसर्गिक शेतीची माहिती

Devendra Shirurkar

सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीच्या प्रचार आणि प्रसारासाठी केंद्रासह अनेक राज्यांत प्रयत्न करण्यात येत आहेत. रासायनिक खतांच्या वापराने होणारे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी केंद्र सरकारकडून नैसर्गिक, सेंद्रिय शेतीचा पुरस्कार करण्यात येत आहे.

Natural Farming | Agrowon

शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे आकर्षित करण्यासाठी सरकारी पातळीवर अनुदान, आर्थिक मदत देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. गुजरात सरकारने रसायनमुक्त शेतीच्या प्रसारासाठी औपचारिक शिक्षणाचे माध्यम वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

Natural Farming | Agrowon

सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीबद्दल जनजागृती करण्यासाठी गुजरात सरकारने या विषयाचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने याबाबतची माहिती दिली आहे.

Natural Farming | Agrowon

इयत्ता नववी ते बारावी या वर्गांच्या अभ्यासक्रमात सेंद्रिय शेतीवर एक स्वतंत्र प्रकरण समाविष्ट करण्यात येणार आहे. शिक्षण विभागाने त्यासाठी नैसर्गिक शेती या विषयातील अभ्यासकांशी बोलणी सुरु केली आहे.

Natural Farming | Agrowon

२०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षात राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता ९ वीच्या पाठयपुस्तकात 'भारतीय शेतीचा इतिहास आणि नैसर्गिक शेतीची ओळख' हे प्रकरण समाविष्ट करण्यात येणार आहे. इयत्ता १० वी, ११ वी आणि १२ वीच्या अभ्यासक्रमातही नैसर्गिक शेतीबद्दलची अद्ययावत प्रकरणे त्यापुढच्या शैक्षणिक वर्षात समाविष्ट करण्यात येणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Natural Farming | Agrowon