Chana  Agrowon
ॲग्रोमनी

Chana Procurement : पश्‍चिम विदर्भासाठी हरभरा खरेदीचे ५ लाख क्विंटलचे वाढीव उद्दिष्ट

Chana Rate : या हंगामात शासनाच्या आधारभूत ५३३५ रुपये किमतीने हरभरा खरेदी सुरू आहे.

Team Agrowon

Akola Chana Market : या हंगामात शासनाच्या आधारभूत ५३३५ रुपये किमतीने हरभरा खरेदी सुरू आहे. बाजारपेठेत हरभऱ्याला दर कमी असल्याने शासकीय खरेदीला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत दोन वेळा उद्दिष्ट वाढवून द्यावे लागले.

आता पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत हरभरा खरेदीचे सुमारे पाच लाख क्विंटलने उद्दिष्ट वाढवले असून, लवकरच याबाबत अधिकृत पत्र निघणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शासकीय हरभरा खरेदी नाफेडमार्फत आठ ते नऊ एजन्सीजद्वारे केली जात आहे. जिल्ह्याजिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन, विदर्भ मार्केटिंग फेडरेशन, शेतकरी कंपन्यांद्वारे प्रत्येक तालुक्यात खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले आहेत.

राज्यात आतापर्यंत खरेदीचा आकडा ६५ लाख क्विंटलपेक्षा अधिक झालेला आहे. यंदा खरेदीसाठी उत्पादकतेच्या २५ टक्के खरेदीचा निकष लावल्याने अडचण झाली होती. त्यानुसार पहिल्यांदा मिळालेले उद्दिष्ट केव्हाच पूर्ण झाले. त्यानंतर बरेच दिवस खरेदी बंदही राहिली.

एकदा उद्दिष्ट वाढवून दिल्यावरही नोंदणीकृत शेतकरी पूर्ण होणे शक्य नसल्याने आता दुसऱ्यांदा खरेदीचा लक्ष्यांक वाढवून दिला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्याला एक लाख क्विंटल, तर बुलडाणा, अमरावती प्रत्येकी दीड लाख, यवतमाळ ७० हजार आणि वाशीम जिल्ह्याला ३० हजार क्विंटलचा लक्ष्यांक वाढवून मिळाला आहे. त्यानुसार खरेदीची प्रक्रिया सुरू राहणार आहे. यंदाच्या हंगामात ११ जूनपर्यंत नाफेडची ही खरेदी होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT