Cotton, Soybean
Cotton, Soybean Agrowon
ॲग्रोमनी

Cotton Soybean Market : कापूस, सोयाबीनचा बाजार आज कसा राहिला?

Anil Jadhao 

अनिल जाधव
पुणेः शेतकरी मागील दीड महिन्यापासून कापूस आणि सोयाबीन दरवाढीची (Cotton Soybean Market ) वाट पाहत आहेत. मात्र देशातील दरपातळी अद्यापही शेतकऱ्यांना पाहीजे तेवढी वाढली नाही.

पण आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस आणि सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) चढ उतार सुरु आहेत. आज देशातील बाजारात कापसाला सरासरी ८ हजार ५०० ते ९ हजार रुपये दर मिळाला.

तर सोयाबीनची दरपातळी ५ हजार ३०० ते ५ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होती.

देशात आज कापसाचे दर काही बाजारांमध्ये वाढले होते. आता बहुतेक बाजार समित्यांमधील सरासरी भाव ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान पोचला.

तर देशातील कमाल दर आजही ९ हजार रुपयांवर होता. पण किमान दरात सतत वाढ होत आहे. किमान दर म्हणजे बाजारात कापसाला मिळणारा कमीत कमी दर.

हा किमान दर आता ८ हजार रुपयांवर पोचला. म्हणजेच आता किमान आणि कमाल दरातील तफावत आता कमी झाली.

आज देशातील बाजारात कापसाला सरासरी भाव ८ हजार ५०० ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान मिळाला. मागील दोन दिवसांपासून ही दरपातळी कायम असल्याचं दिसतं.

तर राज्यातील दरपातळीही आता यादरम्यान पोचली. राज्यातील बाजारातील कापूस आवकही मर्यादीत दिसते.

तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरातील चढ उतार कायम आहेत. काल सीबाॅटवर कापसाचे वायदे ८२.८४ सेंट प्रतिपाउंडवर बंद झाले होते.

रुपयात हा भाव १५ हजार १०४ रुपये क्विंटल होतो. आज बाजार सुरु झाल्यानंतरही दरात चढ उतार सुरु होते. सायंकाळी ५ वाजेपर्यंत वायदे ८२.९९ सेंटवर पोचले होते. म्हणजेच १५ हजार १३१ रुपये प्रतिक्विंटलवर कापूस पोचला होता.


सोयाबीनचा बाजार कसा राहीला?

आज देशातील बाजारात सोयाबीनची आवक जवळपास ४ लाख ५० हजार क्विंटल झाली होती. पण दरपातळी आजही ५ हजार ३०० ते ५ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होती.

तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्याही दरात चढ उतार कायम आहेत. बाजार सुरु झाल्यानंंतर दर वाढतात आणि शेवटच्या टप्प्यात दर कमी होतात.

असं मागील काही दिवसांपासून सुरु आहे. काल बाजार १४.६९ डाॅलरवर बंद झाला होतो. रुपयात हा दर ४ हजार ४९४ रुपये होतो. तर आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत दर १४.८१ डाॅलरवर पोचले होते. म्हणजेच ४ हजार ५३१ वर पोचले.

काय राहू शकते दरपातळी?


सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस आणि सोयाबीनच्या दरात चढ उतार सुरु आहेत. त्याचा परिणाम देशातील बाजारावरही जाणवतोय.

पण पुढील काही दिवसांमध्ये कापूस आणि सोयाबीन दरात सुधारणा होऊ शकते. सध्याची स्थिती पाहता या महिन्याच्या शेवटी कापसाची सरासरी दरपातळी ८५०० ते ९५०० रुपये होऊ शकते.

तर सोयाबीनचा भाव ५५०० ते ५८०० रुपयांच्या दरम्यान पोहचू शकतो, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT