Anil Jadhao
आंतरराष्ट्रीय बाजारात गेले आठवडाभर सोयाबीनच्या दरात चढ उतार राहीले. सोमवारी बाजार उघडला तेव्हा सोयाबीन १४.५५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होता.
आठवडाभर दर कमी जास्त होत शुक्रवारी १४.८० डाॅलरवर बाजार बंद झाला. म्हणजेच आठवडाभरात सोयाबीन दर २५ सेंटने सुधारलं.
सोयातेलाचे दर सोमवारी ६२ सेंट प्रतिपाऊंडवर होते. ते आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शुक्रवारी ६३ सेंटवर पोचले.
आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोयापेंडचा बाजार ४४७ डाॅलर प्रतिटनावर उघडला. मात्र शुक्रवारी सोयापेंडचा बाजार ४६० डाॅलरवर बंद झाला. म्हणजेच सोयापेंडच्या दरात टनामागं १३ डाॅलरची सुधारणा झाली.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात वाढ होऊनही देशात मात्र त्याचा परिणाम जाणवला नाही.
देशातील सोयाबीन बाजार स्थिर राहीला. देशात सोमवारी सोयाबीनला सरासरी प्रतिक्विंटल ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपये दर मिळाला होता. तो शुक्रवारी कायम होता.