Chana Market
Chana Market Agrowon
ॲग्रोमनी

Agrowon Podcast : उष्णतेमुळे हरभरा उत्पादकतेला फटका

Anil Jadhao 

१) कापूस दरात नरमाई (Cotton rate)

देशात आज कापूस दरात क्विंटलमागं २०० रुपयांपर्यंत नरमाई पाहायला मिळाली. आज कापसाला सरासरी ७ हजार ८०० ते ८ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. दुसरीकडे बाजारातील कापूस आवकही वाढली होती.

आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस दरात चढ उतार सुरु आहेत. आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे ८४ सेंट प्रतिपाऊंडवर होते. देशातील कापूस दरात काही दिवस चढ उतार राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

२) सोयाबीन दर स्थिर (Soybean Rate)

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात चढ उतार सुरु आहेत. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे १५.२१ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ४७९ डाॅलरपर्यंत नरमले. तर देशात सोयाबीन भाव आजही स्थिर होते.

आज सोयाबीनला सरासरी ५ हजार १०० ते ५ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. सोयाबीनच्या दरात पुढील काही दिवस चढ उतार राहू शकतात, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहते.

३) कांदा दर दबावातच (onion Rate)

राज्यातील बाजारात कांद्याची आवक वाढली आहे. आवकेचा दबाव जास्त असल्यानं दर तुटले. कांद्याला अगदी २०० रुपयांपासून भाव मिळतोय. त्यामुळं शेतकरी अडचणीत आले. सध्या कांद्याला सरासरी ६०० ते ९०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय.

बाजारावरील कांदा आवकेचा दबाव पुढील तीन आठवड्यांनंतर काहीसा कमी होऊ शकतो. तोपर्यंत कांद्याच्या दरावरील दबाव कायम राहील, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासक व्यक्त करत आहेत.

४) हिरवी मिरची तेजीत (Green Chill Rate)

बाजारात सध्या हिरव्या मिरचीला चांगला भाव मिळतोय. हिरव्या मिरचीची बाजारातील आवक कमी आहे. तर हिरव्या मिरचीला चांगला उठाव आहे. सध्या पुणे, मुंबई, कोल्हापूर बाजार समित्या वगळता इतर ठिकाणी आवक खूपच कमी आहे.

त्यामुळं हिरव्या मिरचीला चांगाल भाव मिळतोय. सध्या हिरवी मिरची २ हजार ५०० ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. पुढील काही दिवस हिरव्या मिरचीचे दर तेजीतच राहतील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

५) यंदा हरभरा बाजारभाव कसे राहू शकतात? (Chana Rate)

राज्यासह देशातील हरभरा काढणी आता वेगाने सुरु झाली. पण हरभरा काढणी जसजशी पुढं सरकतेय, तशी उत्पादन घट पुढे येत आहे. त्यामुळं यंदा देशातील हरभरा उत्पादन कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. देशात यंदा सर्वाधिक हरभरा लागवड महाराष्ट्रात आहे.

शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील उत्पादकता यंदा २० ते २५ टक्क्यांनी कमी राहणार आहे. राजस्थान, मध्य प्रदेशातही हरभरा पिकाला उन्हाचा फटका बसतोय. राजस्थान आणि मध्य प्रदेशात यंदा हरभरा लागवडच कमी झाली होती.

त्यामुळं उत्पादनही घटण्याचा अंदाज आहे. गुजरातमध्येही लागवड ३० टक्क्यांपर्यंत कमी राहिल्याचं राज्य सरकरानं स्पष्ट केलं. मागील काही महिन्यांपासून हरभरा बाजारावर नाफेडच्या विक्रीचा दबाव राहिला.

सध्या नाफेडकडे १४ ते १५ लाख टन हरभऱ्याचा स्टाॅक असण्याची शक्यता आहे. पण नाफेड लवकरच हरभरा विक्री बंद करण्याची शक्यता आहे. नाफेडची खरेदी सुरु होणार आहे. मागील काही दिवसांपासून दिवसा तापमान जास्त वाढतंय. त्यामुळं हरभरा उत्पादता घट पुढे येत आहे.

बाजाराचे लक्ष सध्या महाराष्ट्रातील उत्पादतेकडे आहे. राज्यात उत्पादकता कमी येत असल्यानं बाजारावर त्याचा परिणामही दिसत आहे. सध्या हरभऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ६०० ते ५ हजार रुपयांचा भाव मिळतोय.

मात्र उत्पादकता जास्त घटल्यास खुल्या बाजारात हरभरा हमीभावाचा टप्पा गाठू शकतो, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT