Chana  Agrowon
ॲग्रोमनी

Chana Procurement : यवतमाळ जिल्ह्यात आजपासून हरभऱ्याची शासकीय खरेदी

Government Chana Procurement : यवतमाळ जिल्ह्यात हरभरा खरेदीचे उद्दिष्ट संपल्याने हरभरा खरेदी अचानक बंद करण्यात आली होती.

Team Agrowon

Yavatmal Chana News : यवतमाळ जिल्ह्यात हरभरा खरेदीचे उद्दिष्ट संपल्याने हरभरा खरेदी अचानक बंद करण्यात आली होती. त्यानंतर आता वाढीव उद्दिष्ट मिळाल्यानंतर आजपासून (ता. ८) पुन्हा शासकीय खरेदीला सुरुवात होणार आहे.

यवतमाळ जिल्ह्याला यापूर्वी हरभरा खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार १६ जूनपर्यंत खरेदी होणे अपेक्षीत होते. परंतु केंद्रावर हरभरा येण्याचा वेग प्रचंड राहिला. परिणामी, वेळेपूर्वीच हरभरा खरेदीचे उद्दिष्ट संपुष्टात आले.

यामुळे अनेक शेतकऱ्यांवर नोंदणीनंतरही केंद्रावरून आपला शेतमाल परत नेण्याची वेळ आली. तब्बल २३ हजारावर शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. मोठ्या संख्येतील शेतकऱ्यांना आपल्या हरभऱ्याची विक्री करता आली नाही.

परिणामी, हरभरा खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्यात यावे, अशी मागणी केली जात होती. स्थानिक पातळीवर दबाव वाढल्याने अखेरीस प्रशासनाकडून १ लाख ५ हजार ९७१ क्‍विंटल हरभरा खरेदीचे वाढीव उद्दिष्ट देण्यात आले आहे.

वाढीव उद्दिष्टानुसार सोमवार (ता. ८) पासून खरेदीला सुरुवात होईल. यामध्ये सुरुवातीचे आठ दिवस यापूर्वी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडील हरभऱ्याची खरेदी होईल. त्यांच्याकरिता सुरुवातीचे आठ दिवस राखून ठेवण्यात आले आहेत. त्यानंतर मात्र नव्याने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी केला जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT