Cotton Market Agrowon
ॲग्रोमनी

Cotton Market : देशातील कापूस दर वाढतील की नाही?

देशात महिन्याला सध्या २८ ते ३० लाख गाठी कापूस वापर होत आहे. एप्रिलपासून आवक पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे.

Anil Jadhao 

Cotton Rate : मार्च महिन्यात देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात नरमाई आली. देशातील वाढलेली आवक आणि अमेरिकेतील बॅकींग क्षेत्रातील संकट यामुळं बाजारावर दबाव आहे. त्यामुळं देशातील कापूस उत्पादनाचा अंदाज कमी होऊनही दरात सुधारणा झाली नाही.

पण ही स्थिती जास्त दिवस टिकणार नाही. एप्रिलमध्ये कापूस दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

आंतरराष्ट्रीय बाजारात १ मार्च रोजी कापसाचे वायदे ८६ सेंट प्रतिपाऊंडवर होते. त्यानंतर मात्र दरात चढ उतार होत नरमाई आली. ९ मार्चनंतर दरातील घट जास्त होती. अमेरिकेतील बॅंकींग क्षेत्रात आलेल्या संकटामुळं कापूस जास्त नरमला.

चालू हंगामात नोव्हेंबरनंतर पहिल्यांदा कापूस दराने ७७.६३ सेंटचा चप्पा गाठला. बॅकींग क्षेत्रात अस्थिरता आल्यानंतर गुंतवणूकदार शेतीमाल बाजारातील गुंतवणूक कमी करतात.

त्याचाच फटका सध्या कापसालाही बसत आहे. पण ही स्थिती जास्त काळ चालणार नाही, अशी शक्यता या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.

देशात मार्च महिन्यात कापसाची आवक जास्त होते. मार्च महिन्यात कापसाची आवक सरासरी ६० ते ६५ हजार गाठींच्या दरम्यान असते. पण सध्या देशातील बाजारात कापसाची आवक सरासरी १ लाख २० ते १ लाख ३५ हजार गाठींच्या दरम्यान आवक होत आहे.

बाजारातील कापूस आवक जास्त होत असल्याने दरावर दबाव आला. त्यातच बॅंकींग क्षेत्रातील संकटाने आंतरराष्ट्रीय चलन बाजारात अस्थिरता आली. त्याचा परिणाम कापूस निर्यातीवर होत आहे. यामुळे सध्या कापूस दरावर दबाव आहे.

काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाने मागील आठवड्यात देशातील कापूस उत्पानाचा अंदाज कमी करून ३१३ लाख गाठींवर आणला. उत्पादनाचा अंदाज कमी झाल्यानं देशातील बाजारात सुधरणा होणं अपेक्षित होतं.

पण बाजारातील वाढलेली आवक आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती यामुळं दरात सुधारणा दिसली नाही. पण देशातील उत्पादन घटल्याचं स्पष्ट झालं.

त्यामुळं बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दरात सुधारणा होईल. एप्रिल मध्यानंतर कापूस आवक कमी होऊन दरात सुधाणा होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

उत्पादन कमी

देशात महिन्याला सध्या २८ ते ३० लाख गाठी कापूस वापर होत आहे. एप्रिलपासून आवक पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे. तर उतपादन घटल्यानं पुढील हंगामासाठी केवळ २७ लाख गाठी कापूस शिल्लक राहील, असा अंदाज आहे.

म्हणजेच पुढील हंगामासाठी केवळ एक महिना पुरेल एवढा कापूस शिल्लक राहील. त्यामुळं बाजारातील आवक मर्यादीत झाल्यानंतर एप्रिलमध्ये कापूस दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत.

किती सुधारणा होऊ शकते?

सध्या देशातील बाजारात कापसाला सरासरी ७ हजार ७०० ते ८ हजार १०० रुपये दर मिळतोय. एप्रिलच्या महिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत कापूस आवकेचा दबाव राहू शकतो. या काळात जास्तीत जास्त कापूस बाजारात येईल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

त्यानंतर मात्र आवक कमी होऊन दरात सुधारणा होऊ शकते. कापसाची सरासरी दरपातळी किमान ३०० ते ४०० रुपयाने सुधारु शकते. असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT