Chana Market Agrowon
ॲग्रोमनी

Chana Market : हरभरा आवक मंदावली; दरात सुधारणा होईल का?

Chana Rate : बाजारातील हरभरा आवक आता कमी झाली. त्यामुळे काही बाजारांमध्ये हरभरा भावात सुधारणा पाहायला मिळाली. पण हरभरा भावातील सुधारणा पुढील काळात टिकून राहण्याचा अंदाज कमी असल्याचं जाणकार सांगतात.

Anil Jadhao 

Chana Bajarbhav : बाजारातील हरभरा आवक आता कमी झाली. त्यामुळे काही बाजारांमध्ये हरभरा भावात सुधारणा पाहायला मिळाली. पण हरभरा भावातील सुधारणा पुढील काळात टिकून राहण्याचा अंदाज कमी असल्याचं जाणकार सांगतात.

सरकारकडे हरभऱ्याचा स्टाॅक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हा स्टाॅक सरकार बाजारात आणू शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे.

देशातील बाजारात हरभरा आवक आता कमी झाली. नाफेडच्या केंद्रांवरही हरभरा खरेदीची गती मंद झाली. सध्या नाफेडने २३ लाख टनांपर्यंत हरभरा खरेदी केला.

गेल्यावर्षीपेक्षा यंदाची खरेदी ३ लाख टनांनी कमी आहे. पण यंदाही नाफेडचा मोठा स्टाॅकीस्ट ठरला. यंदाची खरेदी २३ लाख टन आणि मागील हंगामातील स्टाॅक १५ लाख टन, असा एकूण ३८ लाख टन हरभरा नाफेडकडे आहे.

मागील काही दिवसांपासून बाजारातील हरभरा आवक कमी झाल्यानंतर बाजारात हरभरा भावात काहीशी सुधारणा दिसली होती. मुंबई, लातूर, इंदोर, जयपूर, जोधपूर आदी बाजारांमध्ये हरभरा भाव क्विंटलमागे ५० ते १०० रुपयाने वाढला. पण शेतकऱ्यांना मिळणारा भाव कायम होता. सध्या ४ हजार ६०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान हरभरा विकला जात आहे. केवळ घाऊक विक्रीचे भाव वाढले होते.

स्टाॅकीस्ट सक्रीय होतील?

बाजारातील आवक कमी झाल्याने बाजारात स्टाॅकीस्ट सक्रीय होत असल्याचीही चर्चा आहे. सरकारकडे हरभऱ्याचा मोठा स्टाॅक आहे. यंदाचं वर्ष काहीसं वेगळं असल्याचं व्यापारी सांगतात. यंदा एल निनोची स्थिती आहे. पाऊमान देशात सरासरी राहण्याचा अंदाज आहे.

त्यामुळे रबीतील हरभरा लागवड आणि उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही शक्यता गृहीत धरुन स्टाॅकीस्ट बाजारात उतरु शकतात.

सध्या दबाव नाफेडच्या स्टाॅकचा

सध्या बाजारावर सरकारचा दबाव कायम आहे. खरी भीती आहे ती नाफेडकडील स्टाॅकची. नाफेड मागील हंगामातील हरभरा स्टाॅक पुढील काही दिवसांमध्ये बाजारात आणायची तयारी करत असल्याचीही चर्चा आहे.

याकडे सर्व बाजाराचे लक्ष आहे. नाफेडने खुल्या बाजारात हरभरा विक्री सुरु केल्यास बाजारावर दबाव राहू शकतो, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

हरभरा वापर वाढेल का?

यंदा देशात तूर, उडीद आणि मुगाचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे भाव चांगले आहेत. तुरीने तर अनेक बाजारांमध्ये १० हजारांचा टप्पा पार केला. उडदाचे भाव ९ हजारांपर्यंत पोचले. परिणामी हरभऱ्याला जास्त उठाव मिळू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

स्टाॅकीस्ट बाजारात सक्रीय झालेच तर त्यांचा नजर माॅन्सून काळातील पाऊसमान आणि रबीतील पेरा यावर असेल, असे जाणकारांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

SCROLL FOR NEXT