Indian Rice  Agrowon
ॲग्रोमनी

Rice import: बांगलादेशकडून मागणी वाढल्याने तांदूळ वधारला

यावर्षी बांगलादेशात प्रतिकूल हवामानामुळे भाताच्या पिकाला (Paddy Crop) फटका बसला आहे. तिन्ही हंगामात तांदूळ उत्पादन (Rice Production) घटण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

बांगलादेश सरकारने भारताकडून एक लाख टन तांदूळ खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशात तांदळाचा तुटवडा पडला आहे. तांदळाची देशांतर्गत गरज भागवण्यासाठी बांगलादेशची भारतावर भिस्त आहे. बांगलादेशकडून मागणी वाढल्यामुळे भारतीय तांदळाच्या किमती वाढल्या आहेत.

बांगलादेश सरकारने प्रथमच सरकारी पातळीवरून (Government to Government- G2G) तांदूळ खरेदीचा निर्णय घेतला आहे. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, बांगलादेशच्या अन्न महामंडळाने भारत सरकारसोबत तांदूळ खरेदी करार केला आहे. या करारानुसार बांगलादेश सरकार ४२२ डॉलर प्रति टन दराने (वाहतूक खर्च वगळता) भारताकडून उकडा तांदूळ खरेदी करणार आहे.

बांगलादेश सरकार भारताखेरीज दक्षिण-पूर्व आशियायी देशांतूनही तांदूळ खरेदी करणार आहे. बांगलादेश यंदा भारताकडून खासगी आणि सरकारी खरेदीच्या माध्यमातून कमीत कमी १० लाख टन तांदूळ आयात (Rice Import) करणार असल्याचा सरकारी सूत्रांचा कयास आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार टन तांदळाची आयात गेल्या काही आठवड्यांत झालेली आहे.

यावर्षी बांगलादेशात प्रतिकूल हवामानामुळे भाताच्या पिकाला (Paddy Crop) फटका बसला आहे. तिन्ही हंगामात तांदूळ उत्पादन (Rice Production) घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेख हसीना सरकारने देशात तांदळाचा पुरेसा साठा करण्यासाठी कंबर कसली आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या (USDA) मते बांगलादेश यावर्षी ६.५ लाख टन तांदूळ आयात करण्याची शक्यता आहे. अन्न सुरक्षेचा विचार करून बांगलादेश सरकारने तांदळावरील आयातशुल्क सध्याच्या २५ टक्क्यांवरून शून्य टक्क्यांवर आणण्याचा निर्णय घेतला आहे.

श्रीलंकेसारखे खाद्य संकट (Food Crisis) निर्माण होऊ नये या भीतीने बांगलादेश चढ्या दराने तांदूळ आयात करत आहे. त्याचा परिणाम तांदळाच्या किंमतीवर झाला आहे. भारतात भाताचे घटलेले पेरणी क्षेत्र आणि निर्यातीसाठी वाढलेली मागणी यामुळे तांदळाचे दर वाढले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Crushing Season: शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीची शासनाची भूमिका

Sugarcane Crushing Season: एकरी शंभर टन ऊस उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवा

Hasan Mushrif: शेतकरी कर्जबाजारीच होऊ नये यासाठी उपाययोजना करा : मंत्री हसन मुश्रीफ

Agri Stack: भरपाईसाठी ई-केवायसी रद्द, पण ‘फार्मर आयडी’ अनिवार्य

Farm Roads: अहिल्यानगरमधील शेत, शिव,पाणंद रस्त्यासाठी विशेष मोहीम

SCROLL FOR NEXT