बांधावरचा शेवगा देतो भरघोस उत्पन्न 
बांधावरचा शेवगा देतो भरघोस उत्पन्न  
ॲग्रोमनी

बांधावरचा शेवगा देतो भरघोस उत्पन्न 

सतीश कुलकर्णी

पुणे जिल्ह्यातील केळवडे (ता. भोर) येथील श्यामसुंदर जायगुडे यांच्याकडे सेंद्रिय पद्धतीने फळबाग, ४० प्रकारच्या परदेशी भाज्यांची लागवड असते. त्यांच्या शेतीचे बांधही जिवंत असून, त्यावर विविध झाडांची लागवड केली आहे. त्यात १२० शेवगा झाडे आहेत. अन्य सेंद्रिय भाज्यांसह शेवगा शेंगाची विक्री पुणे, मुंबई येथील सेंद्रिय उत्पादनांची घरपोच विक्री करणाऱ्या कंपन्यांना केली जाते. वर्षभर त्याचा दर ८० रुपये प्रति किलो असा बांधलेला आहे. जानेवारी ते जून या काळात शेंगाचे उत्पादन मिळते. हा हंगाम संपताच झाडांची छाटणी करून अनावश्यक फुटवे काढून शेतात आच्छादन किंवा कंपोस्टिंगसाठी टाकले जात. मात्र, अभ्यासाअंती या पाल्यातून गुणधर्म, पोषकता याची माहिती झाली. ही माहिती थक्क करणारी होती. पाचकक्षमता वाढवणारा, पोटातील अल्सर, अस्थमा, डोकेदुखी अशा अनेक आजारांवर फायदेशीर ठरणारा बी १२ सह अनेक घटकांनी पोषक पाल्याचा व्यावसायिक वापर करण्याचा निर्णय घेतला.  शेवगा पाला विक्रीचा प्रयत्न ः  श्यामसुंदर जायगुडे त्यांच्याकडून खरेदी करून घरपोच करणाऱ्या कंपन्यांना शेवगा पाल्याचे महत्त्व सांगू लागले. त्यासाठी यू ट्यूबवरील विविध व्हिडियो, मेसेज आणि माहितीचा वापर केला. त्यांनीही त्यांच्या शहरी ग्राहकांपर्यंत ही माहिती पोचवल्याने शेवगा पाल्याला मागणी येऊ लागली. साधारण २०० ग्रॅम शेवगा पाला गड्डीसाठी २० रुपये याप्रमाणे विक्री सुरू झाली. पहिल्याच हंगामात १०० गड्ड्यांची विक्री झाली. आता प्रति आठवडा सरासरी ५०० ते ७०० गड्ड्यांची मागणी असते.  वाळलेल्या पाल्यासाठी ड्रायरची खरेदी ः  अन्य काही कंपन्याकडून सावलीमध्ये वाळलेल्या शेवगा पाल्याची मागणी होऊ लागली. उन्हामध्ये वाळवलेल्या पाल्यातील पोषक घटक कमी होतात. रंग व दर्जा घटतो. हे लक्षात आल्याने शेवगा पाला वाळवण्यासठी विद्युत ऊर्जेवर चालणारा ड्रायर खरेदी केला. त्यामध्ये १० किलोपर्यंत ओला पाला वाळवता येतो. १० किलोपासून एक किलो वाळलेला पाला मिळतो. त्याचे ५० ग्रॅम, १०० ग्रॅम ते १ किलोपर्यंत मागणीनुसार पॅकिंग केले जाते. कंपन्याकडून प्रतिकिलो १००० रुपये दर मिळतो.  अर्थशास्त्र 

  • ५ वर्षे वयाच्या झाडापासून सुमारे ५० ते ६० किलो ओला पाला मिळू शकतो. पण संपूर्ण पाला काढल्यास शेंगाचे उत्पादन मिळत नाही. त्यामुळे मागणीनुसार विरळणी करून साधारणपणे १० ते १२ किलो पाला काढला जातो. ओला पाला २०० ग्रॅम गड्डीसाठी २० रुपये प्रमाणे (प्रतिकिलो १०० रु.) विकला जातो. 
  • तो वाळवल्यावर शेवगा पाल्याचे वजन १ ते १.२ किलो मिळते. सध्या त्याची विक्री १००० रुपये प्रतिकिलोने केली जात आहे. 
  • शेवगा भुकटी करून घाऊक विक्रीसाठी आयुर्वेदिक कंपन्यांबरोबर बोलणी चालू आहेत. मात्र, या कंपन्याची मागणी ४५० ते ५०० रुपये प्रतिकिलो अशी असल्याने थांबलो आहे. 
  • या व्यतिरिक्त शेंगाचे उत्पादन प्रतिझाड ३० ते ५० किलोपर्यंत होते. त्याला कराराप्रमाणे ८० रुपये प्रतिकिलो दर मिळतो. 
  • बांधावरच्या १२० झाडांच्या शेंगा व पाला विक्रीतून सुमारे ५.४ लाख रुपयांचे उत्पन्न प्रतिवर्ष मिळते. 
  • श्यामसुंदर जायगुडे, ९८९०७९९०७९ . 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

    Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

    Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

    Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

    Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

    SCROLL FOR NEXT