पेरणी
पेरणी  
ॲग्रोमनी

देशात रब्बी मूग पेरणीत २९ टक्के घट

कोजेन्सिस वृत्तसेवा

नवी दिल्ली: देशात रब्बी हंगामाच्या पेरणीला प्रारंभ झाला असून शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. काही राज्यांमध्ये परतीचा आणि मॉन्सूनोत्तर पाऊस लांबल्याने पेरण्याही लांबल्या आहेत. देशात मूगाची लागवड २८.९ टक्क्यांनी कमी झाली असून आतापर्यंत २४ हजार ८०० हेक्टरवर पेरणी झाली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी विभागाने प्रसिध्द केलेल्या अहवालातून मिळाली.  दरम्यान, खरिपात मूग उत्पादक राज्यांमध्ये पावसाचा मूग पिकाला फटका बसल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. त्यामुळे मूग बाजारात चांगलाच भाव खात आहे. ऑक्टोबर महिन्यात मुगाच्या दरात १५ टक्के वाढ झाली होती. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकालाही चांगला दर मिळण्याची शक्यता व्यापारी सूत्रांनी व्यक्त केली आहे.  खरिपात मॉन्सूनचे उशिरा आगमन झाले. परिणामी, पेरण्याही लांबल्याने हंगाम लांबला. त्यामुळे रब्बी पेरणीलाही उशीर होत आहे. त्यातच ऐन काढणीच्या काळात पावसाने हजेरी लावल्याने काढणीला उशीर होत आहे. त्याचाही परिणाम रब्बी पेरणीवर झाला, असेही व्यापाऱ्यांनी सांगितले. दक्षिण भारतात सरासरीपेक्षा ३२ टक्के अधिक पाऊस झाला असून मध्य भारतात ९७ टक्के अधीक पाऊस झाला आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली.  केंद्र सरकारने २०१९-२० च्या हंगामात मुगाचे उत्पादन वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. गेल्या वर्षी ५ लाख १० हजार टन उत्पादन झाले होते. यंदा ७ लाख टन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.  तमिळनाडूतही पेरणी माघारली देशात मूग उत्पादनात तामिळनाडू आणि मध्य प्रदेश हे अग्रेसर राज्ये आहेत. तमिळनाडूत मूग पेरणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ३९ टक्के घट झाली असून १४ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. मध्य प्रदेशात अद्याप मूग पेरणीला प्रारंभ झाला नाही. मध्य प्रदेशात यंदा सरासरीपेक्षा ५२ टक्के अधिक पाऊस झाला आहे.  ओडिशात क्षेत्र वाढले ओडिशा राज्यात रब्बी मुगाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असते. राज्यातील काही भागांत आलेल्या पुरामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. पाऊस चांगला झाल्याने राज्यात रब्बी पेरणीलाही जोर आला आहे. मूग लागवडीत यंदा मागील वर्षीच्या तुलनेत १६.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यात आतापर्यंत ७ हजार ७०० हेक्टरवर मुगाची लागवड झाली आहे. राज्यनिहाय मूग लागवडीची स्थिती (हेक्टरमध्ये)

राज्य  २०१९-२०  २०१८-१९   बदल (%)
आंध्र प्रदेश ३,०००  ३,०००  ०
छत्तीसगड १००  १,३०० (-)९२.३
ओडिशा  ७,७००   ६,६००  १६.७
तमिळनाडू १४,००० २३,००० (-)३९.१
तेलंगणा  १,०००  (-)१०० 
एकूण   २४,८००  ३४,९०० (-)२८.९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

Agriculture Processing Industry : प्रक्रिया उद्योगात तयार झाली ओळख

Hanneborg Farm : नॉर्वेमधील ग्राहकांची ‘हॅनेबॉर्ग फार्म’ला पसंती

SCROLL FOR NEXT