खानदेशात १२ लाख गाठी बाजारात कापसाची आवक 
ॲग्रोमनी

खानदेशात १२ लाख गाठी बाजारात कापसाची आवक

टीम अॅग्रोवन

जळगाव : कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात बऱ्यापैकी गतीने सुरू झाली. दर स्थिर असून, ४८०० ते कमाल ५१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर खेडा खरेदीत शेतकऱ्यांना मिळत आहेत.  खानदेशात पणन महासंघासह भारतीय कापूस महामंडळाची (सीसीआय) कापूस खरेदीदेखील सुरू आहे. शासकीय खरेदी वेगात सुरू असल्याने खेडा खरेदीमध्ये कापसाचे दर मागील २० ते २५ दिवसांपासून स्थिर आहेत. खानदेशात सर्वत्र खेडा खरेदीला वेग देण्यात आला आहे. रावेर, यावल व चोपडा भागांतून दर्जेदार कापूस उपलब्ध होत असल्याने या भागात परराज्यातील खरेदीदार आपले एजंट पाठवून खरेदी करीत आहेत. खेडा खरेदीत एकाच शेतकऱ्याकडे ६० ते ७० क्विंटल कापूस असल्यास त्यांना ५१०० ते ५१५० रुपयांचा दर मिळत आहे. तर १० ते २० क्विंटल कापूस विक्रीसंबंधी खेडा खरेदीमध्ये ४८०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटलचा दर खरेदीदार देत आहेत. 

खानदेशात सुमारे ९३ जिनिंग प्रेसिंग कारखाने सुरू आहेत. या कारखान्यांमध्ये खरेदी सुरू असून, काही कारखानदार कापसाची खेडा खरेदी एजंटच्या माध्यमातून करून घेत आहेत. सुमारे १३ लाख गाठींच्या (एक गाठ १७० किलो) कापसाची आवक खानदेशात सर्वत्र मिळून झाल्याचा अंदाज आहे.   धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, नंदुरबार भागात गुजरात, मध्य प्रदेशातील जिनिंग प्रेसिंग कारखानदारांचे एजंट कापसाची खरेदी करीत आहेत.

मागील १० ते १५ दिवसांपासून वातावरण बऱ्यापैकी कोरडे व निरभ्र राहिल्याने शेतात कापसाचा दर्जा चांगला आहे. या दर्जेदार कापसालादेखील चांगले दर मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. यामुळे कमाल शेतकऱ्यांनी आपला दर्जेदार कापूस शासकीय केंद्रात विक्री करणे टाळले आहे. कारण, शासकीय केंद्रात सध्या दर ५२०० ते ५४०० रुपये प्रतिक्विंटल दिला जात आहे. पणन महासंघाची कापूस खरेदी बंदावस्थेत आहे. तर भारतीय कापूस महांडळाची धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा व नंदुरबार तर जळगाव जिल्ह्यांतील चोपडा, जळगाव, एरंडोल, पाचोरा, जामनेरातील शेंदूर्णी, पहूर, बोदवड, भुसावळ येथे कापूस खरेदी सुरू आहे. महामंडळाने मागील आठवड्यापर्यंत सुमारे ८५ हजार क्विंटल कापसाची खरेदी केली आहे.  गुजरात, मध्य प्रदेशातील खरेदीदार दाखल कापसाखालील क्षेत्र झपाट्याने रिकामे झाल्याने कापसाचा तुटवडा काही जिनिंग कारखान्यांना भासू लागला आहे. यातच गुजरात, मध्य प्रदेशातील खरेदीदार खानदेशातील धुळे जिल्ह्यातील शिरपूर, नंदुरबारमधील तळोदा, शहादा, जळगावमधील यावल, चोपडा, जळगाव भागांत कापसाची खरेदी करीत आहेत. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, एरंडोल भागातील जिनींग कारखानदारांकडून कापसाची खरेदी फारशी सुरू नाही. जो साठा आहे, तो रिकामा करून घेण्याकडे जिल्ह्यातील कारखानदारांचा कल आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT